(उपसर्ग जोडून लिहूया - वाचूया.)
● शब्दाच्या आधी जोडलेल्या अक्षराला
उपसर्ग म्हणतात. उदा. सु + गंध = सुगंध
● मूळशब्दाला उपसर्ग लावून नवीन शब्द
तयार करता येणे.
(१)खालील शब्दांना ' सु ' उपसर्ग लावून
शब्द लिहा व वाचा.
गंध -- सुगंध
दिन -- सुदिन
कन्या -- सुकन्या
विचार -- सुविचार
शांत -- सुशांत
काळ -- सुकाळ
कर -- सुकर
गम -- सुगम
यश -- सुयश
वास -- सुवास
(२) खालील शब्दांना ' प्र ' उपसर्ग लावून
शब्द लिहा व वाचा.
गती -- प्रगती
मोद -- प्रमोद
शांत -- प्रशांत
ताप -- प्रताप
बल -- प्रबल
कोप -- प्रकोप
हार -- प्रहार
कार -- प्रकार
चार -- प्रचार
भाव -- प्रभाव
योग -- प्रयोग
(३) खालील शब्दांना 'अ ' उपसर्ग लावून
शब्द लिहा व वाचा.
चल -- अचल
पूर्ण -- अपूर्ण
सत्य -- असत्य
भय -- अभय
हिंसा -- अहिंसा
जाण -- अजाण
बोल -- अबोल
न्याय -- अन्याय
खंड -- अखंड
ज्ञान -- अज्ञान
(४) खालील शब्दांना 'ना' उपसर्ग लावून
शब्द लिहा व वाचा.
पास -- नापास
पसंत -- नापसंत
इलाज -- नाइलाज
बाद -- नाबाद
खुशी -- नाखुशी
राज -- नाराज
दान -- नादान
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment