लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ
गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म
२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील
चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव
केशव असे होते. पण 'बाळ ' हे टोपण नावच
कायम राहिले. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.
लोकमान्य टिळक हे इंग्रज सरकारच्या
अन्यायी व पक्षपाती धोरणा विरूद्ध आवाज
उठविण्यात नेहमीच आघाडीवर होते. त्यासाठी
त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता.
' स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे '
हे त्याचे घोषवाक्य होते. .लोकांनी त्यांना
'लोकमान्य ' ही पदवी दिली. कारण त्यांनी
आपले सारे आयुष्य देशाच्या व देशबांधवांच्या
सेवेत घालविले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह
व चळवळी उभारली. त्यांनी 'केसरी ' व 'मराठा'
ही वर्तमानपत्रे सुरू केली. शिक्षणासाठी पुण्यात
' न्यू इंग्लिश स्कूल ' ही शाळा काढली.
लोकजागृतीसाठी 'सार्वजनिक' गणेशोत्सव'
व 'शिवजयंती' हे उत्सव सुरू केले.
अनेक वेळा तुरुंगवास भोगूनही ते आपल्या
ध्येयापासून ढळले नाहीत.
१ आॅगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले.
भारतातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला .
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
📞९४२२७३६७७५ (धुळे )
No comments:
Post a Comment