माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 29 December 2018

वैज्ञानिक सामान्यज्ञान

(१) सौरचुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का असतो  ?

--- काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो,
म्हणून सौरचुलीतील भांड्यांना बाहेरून
काळा रंग असतो.
--------------------------------------------------

(२) थंडीमुळे खडक कसे फुटतात  ?

--- खडकाच्या भेगांत साठलेले पाणी थंडीत
गोठल्यामुळे त्याचे आकारमान वाढते आणि
त्यामुळे खडक फुटतात.
-------------------------------------------------

(३) विद्युत बल्बमध्ये आॅक्सिजन नसतानाही तो का जळतो  ?

---  विद्युत बल्बमधील तार जळत नाही, तर
तापून शुभ्रोष्ण झाल्याने तिच्यातून प्रकाश
पडतो; म्हणून विद्युत बल्बमध्ये आॅक्सिजन
नसतानाही तो जळतो.
-------------------------------------------------

(४) २४ कॅरेट सोन्याचे अलंकार सहसा करत नाहीत.

--- २४ कॅरेट सोने म्हणजे १०० टक्के शुध्द
सोने असते. २४ कॅरेटचे शुध्द सोने फार मऊ
असल्याने त्यापासून तयार केलेले अलंकार
थोड्याशा दाबामुळे वाकतात, तुटतात;
म्हणून २४ कॅरेट सोन्याचे अलंकार सहसा
तयार करत नाहीत.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
               📞९४२२७३६७७५
      

No comments:

Post a Comment