माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 11 December 2018

मराठी भाषा, लिपी व व्याकरण प्रश्नावली


(१) विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त
      करण्याचे साधन काय ?

---  भाषा

(२) मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा
     वापर करतात  ?

---  देवनागरी

(३) आपल्या घरात बोलली जाणाऱ्या भाषेला
    कोणती भाषा म्हणतात  ?

---  मातृभाषा

(४) ध्वनिचिन्हे कशास म्हणतात  ?

---  अक्षरांना

(५) जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पध्दती आहेत ?

---  दोन

(६) एकापुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या
      पध्दतीला कोणती जोडणी म्हणतात  ?

---  आडवी जोडणी

(६) पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती
      वर्ण आहेत ?

---  ४८

(७) ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या
     अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात  ?

---  शब्द

(८) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना
     आपण काय म्हणतो  ?

---  वर्ण
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५

    

No comments:

Post a Comment