माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 23 December 2018

तर्कशास्त्रीय युक्तिवादावर आधारित प्रश्नावली


(१)प्लास्टिकचा तुकडा पाण्यावर तरंगतो कारण..

--- पाण्याची घनता प्लास्टिकच्या घनतेपेक्षा
    जास्त आहे.

(२) सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश घालण्याचा
      निर्णय योग्य आहे कारण......

-- त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये समतेची भावना
    वाढीस लागते.

(३)रद्दी कागद हा पुनर्निर्मितीसाठी वापरला
      पाहिजे कारण......

--- त्यामुळे कमी प्रमाणात वृक्षतोड करावी
    लागेल.

(४) नदीच्या काठावर कपडे धुऊ नये किंवा
      कचरा सुध्दा टाकू नये कारण.....

--- त्यामुळे जलप्रदूषण होते.

(५) वाढलेली नखे वेळोवेळी कापून टाकावीत
      कारण.....

--- जेवताना नखातील घाण तोंडात जाण्याची
     शक्यता असते.

(६)रोज नियमितपणे आंघोळ करावी कारण...

--- शरीरसफाई होते.

(७) आकाशात फेकलेली वस्तू खाली पडते,
      कारण.....

--- पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल त्या वस्तूस खाली
    खेचते.

(८) समुद्राचे पाणी खारे असते,कारण.....

--- त्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते.

(९) पेटल्या मेणबत्तीस हवाबंद केल्यास ती
      विझते कारण. .....

--- ज्वलनशील वायू आॅक्सिजनचा तुटवडा
    असतो.
======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
               📞९४२२७३६७७५
      

No comments:

Post a Comment