(१) वर्ष :-
--- पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण
करण्यास लागणारा सुमारे ३६५ दिवसांचा
कालावधी म्हणजे एक वर्ष होय.
(२) दिवस :-
--- पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण
करण्यास लागणारा २४ तासांचा कालावधी
म्हणजे एक दिवस होय.
(३) चंद्रकला :-
--- पृथ्वीवरून चंद्राकडे पाहताना आपल्याला
दिसणाऱ्या चंद्राच्या सूर्याकडील प्रकाशित
भागाचा दररोज बदलत जाणारा आकार,
म्हणजे चंद्रकला होय.
(४) आठवडा :-
--- आठवडा हे कालगणनेच एक एकक
आहे. आठवड्याचा कालावधी सात दिवसांचा
असतो.
(५) महिना :-
--- एका अमावास्येपासून दुसर्या अमावास्ये-
पर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक
प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते. या काळास
महिना असे म्हणतात.
(६) पंधरवडा :-
--- १.पंधरवडा हे कालगणनेचे एक एकक
आहे.२.अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंच्या पंधरा
दिवसांच्या कालावधीत चंद्राचा पृथ्वीवरून
दिसणारा प्रकाशित भाग रोज क्रमाक्रमाने
वाढत जातो. ३. पौर्णिमेपासून अअमावास्ये-
पर्यंतच्या पंधरा दिवसाच्या कालावधीत चंद्राचा
पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग रोज
क्रमाक्रमाने कमी होत जातो. ४. या प्रत्येकी
पंधरा - पंधरा दिवसांच्या कालावधीस पंधरवडा
असे म्हणतात.
(७) पौर्णिमा :-
-- ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा
सूर्याकडील प्रकाशित भाग आपल्याला पूर्ण
वर्तुळाकार दिसतो, त्या रात्रीला पौर्णिमा असे
म्हणतात.
(८) अमावास्या :-
--- ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा
सूर्याकडील प्रकाशित भाग आपल्याला
अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला अमावास्या
असे म्हणतात.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment