माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 26 April 2020

सजीवांच्या हालचालींचे वैशिष्ट्ये (सामान्य विज्ञान)

● खालील दिलेल्या सजीवांच्या हालचालींचे वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत; ते सांगा / लिहा.

● सजीव :--
मुंगी, साप, सरडा, कांगारू, बेडूक, गरूड,नाकतोडा , रताळ्याचा वेल, गुलमोहर.

(१) मुंगी

--- मुंगीला सहा पाय असतात. या पायांच्या मदतीने तुरुतुरु चालते.
-------------------------------------------------------
(२) साप

--- सापाला पाय नसल्याने तो सरपटत चालतो.
-------------------------------------------------------
(३) सरडा

--- सरड्याचे शरीर पायांच्या तुलनेत वजनदार असते. त्यामानाने पायाची वाढ कमी असते. सरडा या चार नाजूक पायांवर सरपटल्यासारखा चालतो.
-------------------------------------------------------
(४) कांगारू

--- कांगारूचे मागचे दोन पाय सशक्त आणि ताकदवान असतात. शेपूटही आधाराला असते. त्यामुळे कांगारू या पायांच्या साहाय्याने उड्या मारत चालतात.
-------------------------------------------------------
(५) बेडूक

--- बेडूक पाण्यानजीक आढळतो. आपल्या मागच्या दोन शक्तिशाली पायांनी तो पाण्यात पोहतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांना पडदेही असतात. पुढचे दोन पाय शरीर तोलण्यासाठी उपयोगी पडतात. जमीनीवर असताना मागच्या पायांच्या साहाय्याने तो लांबवर उडी मारू शकतो .
-------------------------------------------------------
(६) गरूड

--- गरूड हा पक्षी उंच आभाळात भरारी मारू शकतो. त्याचे ताकदवान पंख आणि निमुळते शरीर उड्डाणासाठी अनुकूलित झालेले असते.
-------------------------------------------------------
(७) नाकतोडा

--- नाकतोडा पंखांच्या साहाय्याने उड्डाण करतो. तसेच त्याच्या मागच्या पायांची जोडी शक्तिशाली असते. पुढच्या पायांच्या दोन जोड्या शरीर तोलण्यास मदत करतात. नाकतोड्याला एकूण सहा पाय व चार पंख असतात. यांपैकी पायांमुळे तो मीटरभर लांब उडी मारू शकतो.
-------------------------------------------------------
( ८) रताळ्याचा वेल

--- रताळ्याच्या वेलाला आधार लागतो. त्याचे खोड असल्याने ते जमिनीवर किंवा जर आधार मिळाला; तर त्या आधारावर पसरत जाते. वेल वाढताना जिथे 
आधार दिसतो, तेथे ते झुकलेले दिसते. 
-------------------------------------------------------
(९) गुलमोहर

--- गुलमोहर वृक्ष मोठा असतो. तो स्वतः जागा बदलू शकत नाही. दिवसा सूर्यप्रकाशात याच्या पर्णिका आडव्या व ताठ असतात; मात्र रात्र झाल्यावर त्या मिटतात व उभ्या होतात. सूर्यप्रकाशाच्या चेतनेला प्रतिसाद म्हणून पर्णिकांची अशी हालचाल होते.

================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
.जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
.ता. साक्री जि. धुळे 

९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment