(१) झाडांना मी आधार देतो
क्षार व पाणी शोषून घेतो
त्यांना खोडाकडे मी पाठवितो
ओळखा पाहू मी कोण ?
---------------------------------------------------
(२) वनस्पतींना देतो आकार
पानाफुलांना देतो आधार
सर्वांना पोहचवितो पाणी व क्षार
ओळखा पाहू मी कोण ?
--------------------------------------------------
(३) रंग माझा हिरवा हिरवा
माझ्यात आहेत हिरवे कण
करतो तयार वनस्पतींचे अन्न
ओळखा पाहू मी कोण ?
---------------------------------------------------
(४) त-हेत-हेचे रंग मजेचे
वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे
म्हणून देवालाही आवडतो आम्ही
फळांना जन्म देतो आम्ही
ओळखा पाहू आम्ही कोण ?
==============================
उत्तरे :- (१) मूळ (२) खोड (३) पान (४ ) फूल
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जि. प.प्रा. शाळा - जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment