माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 9 April 2020

The Noun Number ( द नाउन नंबर) नामाचे वचन


नामावरून ती वस्तू एक वा एकापेक्षा जास्त याचा बोध होणे म्हणजेच वचन (Number) होय. 

* इंग्रजीत वचनाचे दोन प्रकार आहेत.

(1) Singular Number ( सिंग्यूलर नंबर) एकवचन  
e.g. (उदाहरणार्थ) --- dog , book, boy, cow इत्यादी.

(2) Plural Number ( प्ल्युरल नंबर) अनेकवचन

● एकवचनी सामान्यनामाच्या शेवटी 's' प्रत्यय लावून अनेकवचन करणे.


Singular Number   --- 
Plural Number 
         एकवचन           --    अनेकवचन
1) cap ( कॅप) टोपी --- caps (कॅप्स) टोप्या

2) bag (बॅग)पिशवी --- bags ( बॅग्ज) पिशव्या

3) ball (बाॅल) चेंडू -- balls ( बाॅल्स) चेंडू

4) cow ( काऊ) गाय -- cows ( काऊस) गायी

5) doll (डाॅल ) बाहुली -- dolls ( डाॅल्स) बाहुल्या

6) egg (एग ) अंडे -- eggs ( एग्ज) अंडी

7) eye ( आय) डोळा -- eyes ( आईज) डोळे

8) fan ( फॅन) पंखा -- fans (फॅन्स) पंखे

9) girl ( गर्ल) मुलगी -- girls ( गर्ल्स) मुली

10) ear (इअर) कान -- ears (इअर्स) कान

11) hat ( हॅट) टोपी -- hats ( हॅटस) टोप्या

12) hen (हेन) कोंबडी -- hens (हेन्स) कोंबड्या

13) hut (हट) झोपडी -- huts ( हट्स) झोपडया

14) lamp ( लॅम्प) दिवा -- lamps (लॅम्प्स) दिवे

15) map (मॅप) नकाशा -- maps (मॅप्स) नकाशे

16) mat (मॅट) चटई -- mats ( मॅटस) चटाया

17) ring ( रिंग) अंगठी -- rings (रिंग्ज) अंगठ्या

18) shop ( शाॅप) दुकान -- shops ( शाॅप्स) दुकाने

19) house ( हाऊस) घर -- houses ( हाऊसेस) घरे

20)queen ( क्विन) राणी -- queens (क्विन्स) राण्या

================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
9422736775

No comments:

Post a Comment