कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे. त्याचा रंग काळाकुट्ट असतो. मानेजवळचा भाग मात्र करडा असतो. त्याची चोच खूप मोठी असते. त्याचा आवाज कर्कश असतो. तो काव - काव असे ओरडतो. तो एखाद्या वस्तूकडे बघताना मान वाकडी करुन बघतो. तो खूप चलाख असतो. बघता बघता तो एखादी वस्तू चोचीत उचलून नेतो. तो उंच झाडावर आपले घरटे बांधतो. तो अळ्या , किडे आणि जे इतर काय मिळेल ते खातो. तो घाणेरड्या वस्तू सुध्दा खातो. म्हणून त्याला साफसफाई करणारा पक्षी म्हणतात. एखादा कावळा मरून पडल्यास तेथे काव - काव करत अनेक कावळे एकत्र जमतात. लहान मुलांना हा पक्षी फार आवडतो. त्यांना झोपताना काऊच्या गोष्टी ऐकायला आवडते.
=================================
(२) मांजर
मांजर हा पाळीव प्राणी आहे. त्याच्या अंगावर मऊ केस असतात. त्याचे डोळे घारे असतात. मांजराला मिशाही असतात. मांजर पांढ-या, काळ्या, सोनेरी किंवा करड्या रंगाचे असते. ते 'म्याव म्याव ' करून ओरडते. मांजराला आपले अंग फुगवता येते. तळपायाला असलेल्या मऊ स्नायूंमुळे मांजर फार उंचावरून अलगद खाली उडी मारू शकते. चालतानाही त्याच्या पावलांचा आवाज होत नाही. काही माणसे आवडीने मांजर पाळतात. मांजराला दूध फार आवडते. मांजराला अंधारातही दिसते. म्हणूनच ते रात्री दबा धरंन बसते व उंदीर पकडून गट्ट करते. माऊची पिल्ले फार गोंडस असतात. मांजराला दूध फार आवडते..कधी कधी आपल्या मालकाला फसवून ते खुशाल चोरून दूध पिते.
================================
( ३) वाघ
वाघ हा जंगली प्राणी आहे. तो अतिशय बलवान असतो आणि क्रूर असतो. तो आकाराने लांबट असतो. त्याचे शेपूट लांब असते. त्याचे पंजे मोठे व मऊ असतात. पण पंजांची नखे मात्र तीक्ष्ण असतात. पट्टया वाघ, बिबळ्या वाघ अशा वाघांच्या काही जाती आहेत. वाघ जंगलात गुहेत राहतो. तो जंगलातील प्राण्यांची शिकार करून खातो. कधी कधी गावात शिरून.गुरांना खातो कधी कधी माणसांवरही हल्ला करतो. वाघाचे ओरडणे फार दूरवर ऐकू जाते. त्याच्या ओरडण्याला 'डरकाळी ' असे म्हणतात. त्याच्या डरकाळीने सारा परिसर हादरून जातो.
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment