माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 20 August 2018

चित्रे पहा, पाच वाक्यात माहिती लिहा

          भाषिक उपक्रम

(१) झाडाच्या फांदीवर बसलेला पोपट.

   हा पोपट आहे. पोपट झाडाच्या फांदीवर
बसला आहे. पोपटाचा रंग हिरवा आहे.
त्याची शेपटी लांब आहे. पोपटाची चोच
बाकदार आहे. चोचीचा रंग लाल आहे.
पोपटाच्या गळ्याभोवती लाल रंगाचा पट्टा
आहे. पोपट सुंदर आहे.
-----------------------------------------------

(२) जंगलात फिरणारा हत्ती.

   हा हत्ती आहे. हत्ती रानात हिंडतो आहे.
त्याचे शरीर अवाढव्य आहे. हत्तीला सोंड
आहे. तोंडाजवळ दोन बाकदार सुळे आहेत.
हत्तीचे कान सुपासारखे आहेत. त्याचे डोळे
इवलेसे आहेत. हत्तीची शेपूट आखूड आहे.
हत्तीचे पाय खांबासारखे आहेत.
-------------------------------------------------

(३) मांजर

    ही मांजर आहे. मांजर ही पाळीव प्राणी
आहे. तिच्या अंगावर मऊ केस आहेत.
तिचे डोळे घारे आहेत. मांजराला मिशाही
आहेत. मांजर काळ्या रंगाचे आहे.
-------------------------------------------------

(४) झाडाच्या फांदीवर बसलेला कावळा.

   हा कावळा आहे. कावळा झाडाच्या
फांदीवर बसला आहे. कावळ्याचा रंग
काळा आहे. मानेजवळचा भाग मात्र करडा
आहे. त्याची चोच खूप मोठीआहे. कावळा
सुंदर पक्षी आहे.
-------------------------------------------------

(५) कुत्रा.

   हा कुत्रा आहे. कूत्रा हा पाळीव प्राणी आहे.
कुत्रा शेपटी हलवत शेतात उभा आहे. त्याच्या
गळ्यात पट्टा आहे. कुत्र्याला दोन कान आहेत.
कुत्रा हा इमानी प्राणी आहे. तो घराची व
शेताची राखण करतो.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment