माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 3 August 2018

मराठी शब्द साधना - अलंकारिक शब्द


(१) पाण्यातील बुडबुडा
--- क्षणभंगुर गोष्ट.

(२) तारेवरची कसरत.
--- सावधगिरीने करावयाचे काम.

(३) अंगठाछाप.
--- निरक्षर मनुष्य.

(४) काळाबाजार.
--- खोटा व्यवहार.

(५) गळ्यातील ताईत.
--- अतिशय आवडती व्यक्ती.

(६) जमीन अस्मानचे अंतर.
--- दोन विरोधी गोष्टी.

(७) टांगती तलवार.
--- सतत भीतीची जाणीव .

(८) ताकापुरते रामायण.
--- कामापुरती खुशामत.

(९) दगडावरची रेघ.
--- खोटी न ठरणारी गोष्ट.

(१०) नंदनवन.
--- आनंददायक ठिकाण.

(११) बत्तीशी.
--- दातांची कवळी.

(१२) भाकडकथा.
--- निरर्थक गप्पागोष्टी.

(१३) भानामती.
--- जादू , जादूगारीण.

(१४) रामबाण.
--- अचूक उपाय.

(१५) लक्ष्मणरेषा.
--- मर्यादा,  संयम.

(१६) स्वल्पविराम.
--- क्षणभर विश्रांती.

(१७) हाताचे काकण.
--- स्पष्ट दिसणारी गोष्ट.

(१८) कळसूत्री बाहुले .
--- दुसर्‍याच्या तंत्राने चालणारा.

(१९) कुंभकर्ण.
--- अतिशय झोपाळू.

(२०) छत्तीचा आकडा.
--- शत्रुत्व.

===========================

संकलक :- शंकर सिताराम  चौरे(प्रा. शिक्षक)
                 धुळे ¤ ९४२२७३६७७५ ¤ 

No comments:

Post a Comment