● नातेसंबंधांवरील प्रश्न सोडविण्याआधी सर्वप्रथम स्वतःच्या
घरातील नाती व त्यामधील संबंध समजावून घ्यावेत.
(१) आईच्या आईला काय म्हणतात ?
--- आजी
(२) आईच्या बहिणीला काय म्हणतात ?
--- मावशी
(३) वडलांच्या बहिणीला काय म्हणतात ?
--- आत्या
(४) वडलांच्या भावाला काय म्हणतात ?
--- काका
(५) वडलांच्या वडलांना काय म्हणतात ?
--- आजोबा
(६) आईच्या भावाला काय म्हणतात ?
--- मामा
(७) आईच्या वडलांना काय म्हणतात ?
--- आजोबा
(८) आईची मुलगी आपली कोण ?
--- बहिण
(९) मामाचे बाबा (वडील) आपले कोण ?
--- आजोबा
(१०) मामाची आई आपली कोण ?
--- आजी
(११) मावशीची आई आपली कोण ?
--- आजी
(१२) आईचा मुलगा आपला कोण ?
---- भाऊ
(१३)आईच्या बहिणीची मुलगी आपली कोण ?
---- मावसबहिण
(१४) काकांचे बाबा (वडील) आपले कोण ?
---- आजोबा
(१५) आत्याचे बाबा(वडील) आपले कोण ?
---- आजोबा
(१६) काकांची आई आपली कोण ?
---- आजी
(१७) काकांची बायको आपली कोण ?
---- काकी
(१८) काकांचा मुलगा आपला कोण ?
---- चुलतभाऊ
(१९) काकांची मुलगी आपली कोण ?
---- चुलतबहिण
(२०)बाबांची(वडिलांची) बहिण आपली कोण ?
----- आत्या
(२१) मी माझ्या आई - वडिलांचा कोण ?
---- मुलगा
(२२) मी माझ्या आजी - आजोबांचा कोण ?
---- नातू
(२३) मी माझ्या काका - काकींचा कोण ?
---- पुतण्या
(२४) मी माझ्या मामा -मामीचा कोण ?
----- भाचा
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment