(१) पोरका
--- आई वडिल नसलेला.
(२) निराधार
--- कोणाचाही आधार नसलेला.
(३) पाणवठा
-- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.
(४) पूरग्रस्त
--- पुरांमुळे नुकसान झालेले लोक.
(५) आदिवासी
--- अगदी पूर्वीपासूनचे राहणारे.
(६) उत्क्रांती
--- हळूहळू हळूहळू होणारा बदल.
(७) क्रांती
-- कोणत्याही क्षेत्रात एकाकी होणारा मोठा बदल.
(८) चौक
--- चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
(९) माहेर
--- लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर.
(१०) वरमाय
--- नव-या मुलाची आई.
(११) गायक
--- गाणे गाणारा
(१२) भुयार
--- जमिनीखालील गुप्त मार्ग.
(१३) जलचर
--- पाण्यात राहणारे.
(१४) वैमानिक
--- विमान चालवणारा
(१५) गस्त
--- हिंडून करावयाचा पहारा.
(१६) अजिंक्य
-- ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा.
(१७) स्वार्थी
--- स्वतःचा फायदा करून घेणारा.
(१८) जिज्ञासा
--- जाणून घेण्याची इच्छा.
(१९) वावटळ
-- गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.
(२०) अतिवृष्टी
--- खूप पाऊस पडणे.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे- ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment