माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 21 August 2018

निबंध - आपले सण (थोडक्यात माहिती)


==========================
 
(१) रक्षाबंधन

   रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला असतो.
या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ती
त्याला ओवाळते, मिठाई देते. भाऊ आपल्या
बहिणीला भेटवस्तू देतो. राखी बांधून घेऊन
तो बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतो.
   या प्रथेमुळे बहीण - भावांचे प्रेम दृढ होते.
ही प्रथा सर्व भारतभर मोठ्या उत्साहाने
पाळतात. रक्षाबंधन सण आला की दुकानां-
मध्ये सुंदर, लहान - मोठ्या राख्या विक्रीसाठी
मांडून ठेवलेल्या असतात.
  महाराष्ट्रात हाच सण नारळी पौर्णिमा म्हणूनही
साजरा करतात. कोळी लोक समुद्राला देव
मानतात. खवळलेल्या समुद्राला त्या दिवशी
नारळ अर्पण करतात. ते समुद्राची पुजा करतात.
नवे कपडे आणि दागिने घालून नाचतात,गातात.
------------------------------------------------------

(२) ईद

     ईद हा मुसलमानांचा सण आहे. वर्षातून
खास रमजान ईद व बकरी  ईद या दोन ईद
ते साजऱ्या करतात.
  रमजान ईदमध्ये आकाशात चंद्राचे दर्शन
झाल्यावर मुसलमान रोजे  (उपवास)
पाळतात, आणि नमाज पढतात. हे रोजे एक
महिन्यानंतर परत चंद्राचे दर्शन झाल्यावरच
सोडतात व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर
उठून आंघोळ करून मशिदीत जातात व
नमाज पडतात.
   बकरी ईद हजरत इस्माईलच्या बलिदानाची
आठवण म्हणून साजरी करतात. दोन्ही ईदच्या
वेळी मुसलमान लोक नवे कपडे घालून
मशिदीत  जातात. व नमाज पडतात. त्यानंतर
एकमेकांना आलिंगन देऊन गाठीभेटी घेतात.
' ईद मुबारक ' म्हणून एकमेकांना शुभेच्छा
देतात. प्रत्येकाच्या घरी शीरकुरमा करतात
वे घरी आलेल्या प्रत्येक माणसाचे शीर- कुरमा
देऊन स्वागत करतात. बकरी ईदच्या दिवशी
मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात.
   थोडक्यात ईदच्या सणांमुळे प्रेम, एकात्मता
व बंधुभाव वाढीस लागतो.
----------------------------------------------------

(३) पोळा

        पोळा हा बैलपूजेचा सण आहे. बैल
शेतकऱ्याला मदत करतो. पोळा हा सण
बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण  
आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला
जातो. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या
कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैल
वर्षभर शेतात कष्ट करतो. त्याच्यामुळे
आपल्याला अन्न मिळते. बैल आपला पोशिंदा
आहे. त्याचा मान राखण्यासाठी हा सण
साजरा केला जातो. म्हणून या सणाला
' बैलपोळा ' असेही म्हणतात.
      पोळा हा सण श्रावणातल्या अमावस्येला
साजरा केला जातो. या दिवशी बैलांना
कोणत्याही प्रकारचे काम लावत नाही.
त्यांना या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी
माळरानावर सोडले जाते. आंघोळ घालून
सजवले जाते. त्याला ओवाळून त्याची पूजा
केली जाते. त्याला पुरणपोळीचे जेवण जेवू
घातले जाते. नंतर संध्याकाळी त्यांची
मिरवणूक काढली जाते.
        अशा तर्‍हेने शेतकरी पोळा हा सण
उत्साहाने साजरा करतात.
========================   
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
               मो. ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment