● सांगा सांगा उत्तर सांगा ?
(१) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर - मोर
(२) मोराला 'राष्ट्रीय पक्षी ' म्हणून बहुमान
कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर - १९६२
(३) मोराच्या डोक्यावर काय असते ?
उत्तर - तुरा
(४) मोर नाचायला कधी सुरूवात करतो ?
उत्तर - आकाशात ढग गोळा झाल्यावर.
(५) मोर कोठे राहतो ?
उत्तर - मोर नदीकाठी, सखल भागात किंवा
गर्द झाडाझुडपांत राहतो.
(६) मोराचे घरटे कशाचे बनलेले असते ?
उत्तर -- गवताचे.
(७) कोणत्या महिन्यात लांडोर अंडी घालतो ?
उत्तर -- ज्येष्ठ ते कार्तिक महिन्यात .
(८) मोराच्या नाचण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- मयूरनृत्य
(९) कोणत्या राज्यात पुष्कळ मोर आढळतात ?
उत्तर -- राजस्थान.
(१०) महाराष्ट्रात मयूर अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर -- बीड जिल्हात नायगाव येथे.
(११)मोराचा पिसारा कोणत्या रंगाचा आहे ?
उत्तर -- सप्तरंगी.
(१२) मोराच्या मादीला काय म्हणतात ?
उत्तर -- लांडोर.
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
No comments:
Post a Comment