● खालील प्राणी कोणत्या प्रकारच्या हालचाली
करतात ते सांगा / लिहा.
(१) बेडूक --
--- बेडूक पायांनी टुणटुण उड्या मारू शकतो आणि पोहतो.
(२) झुरळ --
--- झुरळ पायांनी चालते, पंखांनी उडते.
(३) फुलपाखरू --
--- फुलपाखरू पंखांनी उडते.
(४) गाय --
--- गाय चार पायांनी चालते. गरज असेल तेव्हा धावते.
(५) शहामृग --
--- शहामृग वेगाने धावते.
(६) कोळी --
--- कोळी आठ पायांनी आपल्या जाळ्यात चालतो.
(७) बदक --
--- बदक पायांनी जमिनीवर चालते. पाण्यात पोहते.
(८) साप --
--- सापाला पाय नसतात. त्यामुळे सरपटत एका
ठिकाणाहून दुसरीकडे जातात.
(९) मासा --
--- माश्याला पाय नसतात. मासे पाण्यात
पोहण्यासाठी त्यांच्या परांचा उपयोग करतात.
(१०) ससा --
--- ससा टुणटुण उड्या मारत जमिनीवर चालतो.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
धुळे / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment