माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 11 September 2018

निरनिराळे व्यावसायिक

● आपल्या गावात किंवा शहरात निरनिराळे
   व्यवसाय करणारे लोक असतात. यांनाच
  व्यावसायिक असे म्हणतात. फार पूर्वी
  बलुतेदार नावाची पद्धत होती. या पध्दती-
  प्रमाणे ठराविक व्यवसाय त्याच कुटुंबातले
  लोक परंपरागतरीत्या करत असत. आता
  मात्र ज्याला ज्या व्यवसायात रूची वाटते.
  ती व्यक्ती तो व्यवसाय करते.

■ व्यावसायिक-( व्यवसाय/ते करत असलेले काम)
         

 (१) सुतार --
       लाकडाचे फर्निचर तयार करणे.

 (२) डॉक्टर --
       रुग्णाला तपासून औषधोपचार करणे.

(३) शिक्षक --
       शाळा, कॉलेजात शिकवणे.

(४) गवंडी --
      घरे बांधणे.

(५) कुंभार --
      मातीची भांडी तयार करणे.

(६) माळी --
      झाडांची निगा राखणे, बागकाम करणे.

(७) लोहार --
      लोखंडी वस्तू बनवणे.

(८) सोनार --
      सोने /चांदीच्या वस्तू बनवणे.

(९) शिंपी --
      कपडे शिवणे.

(१०) चांभार --
        चपला, बूट तयार करणे, तसेच शिवणे.

(११) न्हावी --
       केस कापणे.

(१२) पोस्टमन --
       पत्रे आणून देणे.

(१३) हमाल --
      सामान वाहून नेणे.

(१४) दुकानदार --
      दुकानात माल - सामान विकणे.

(१५) प्लंबर --
       नळ बसवणे, नळ दुरूस्ती करणे.

(१६) इलेक्ट्रशियन व वापरमन --
       इलेक्ट्रीक व वायरींच्या संबंधातील कामे
        करणे.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                धुळे - ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment