● सूचना :--
१. रस्त्यावरून चालताना रहदारीच्या नियमांचे पालन करा.
२. रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे बघा,
मग डावीकडे बघा; म्हणजे येणाऱ्या व
जाणाऱ्या वाहनांच्या वेगाचा अंदाज येईल.
३. रस्त्याने जाताना पदपथाचा वापर करा व
पदपथ नसल्यास कडेने चाला.
४. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावरून
चालताना हळू आवाजात बोला.
५. रस्त्यावर मोठ्याने बोलून ध्वनिप्रदूषण करू नका.
६. रस्त्यात मध्येच बोलत थांबू नका.
७. रस्त्यात कोणालाही जोरात हाक मारू नका.
८. रस्त्यातून चालताना दोस्तांच्या हातात हात घालून चालू नका.
९. रस्त्यावर कागदाचे बोळे, कचरा, फळांच्या साली टाकू नका.
१०. रस्त्यावर थुंकू नका. रस्ते स्वच्छ ठेवणे
हे आपले कर्तव्य आहे.
११. लहान मुले व अंध व्यक्तींना रस्ता
ओलांडण्यास मदत करा.
१२. रस्त्यावर चालताना अपघात झालेला दिसल्यास
ताबडतोब थांबून आवश्यक ती मदत करा
जीव वाचवा.
१३. चुकीच्या पद्धतीने कधीही रेल्वे लाईन क्राॅस करू नका.
१४. एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्या प्लॅटफॉर्मवर
जाताना पदचारी पुलाचा उपयोग करा.
=========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
धुळे / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment