माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 12 September 2018

चला आपण सूर्यग्रहणाची माहिती घेऊया !

               सूर्यग्रहण
● ग्रहण :-
   वेगवेगळ्या भ्रमणकक्षांमध्ये फिरणारे सूर्य,
   चंद्र, पृथ्वी जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात
   तेव्हा ग्रहण लागते.  ही घटना नैसर्गिक आहे.
         
(१) सूर्यग्रहण :-
   
   ▪ सूर्य हा आकाराने प्रचंड मोठा असलेला
      विस्तारित प्रकाशस्त्रोत आहे.
 
   ▪ जेव्हा सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो,
     तेव्हा चंद्रामुळे सूर्यप्रकाश अडवला जातो. 
   ▪ यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.
   ▪  या सावलीच्या भागातून सूर्यबिंब दिसत
      नाही किंवा आंशिक दिसते. या घटनेस
      ' सूर्यग्रहण' म्हणतात.
  ▪ जेव्हा सूर्यबिंब चंद्राने पूर्णपणे झाकलेले
    असते, तेव्हा त्या ग्रहणास खग्रास सूर्यग्रहण
     म्हणतात.
  ▪ जेव्हा सूर्यबिंब चंद्राने पूर्णपणे झाकलेले
    नसते, तेव्हा त्या ग्रहणास खंडग्रास सूर्यग्रहण
    म्हणतात.
  ▪ सूर्याकडून निघणारी हानिकारक अतिनील
     किरणे सूर्यग्रहणाच्या वेळीसुध्दा पृथ्वीवर
     पोहोचत असतात. त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या
     डोळ्यांनी न बघता विशिष्ट प्रकारचे चष्मे
      वापरून बघावे.
  ▪ सूर्यग्रहण फक्त अमावास्येच्या दिवशी
      होते. सर्वच अमावस्यांना सूर्यग्रहण
      होत नाही.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                धुळे   /   ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment