चंद्रग्रहण
● ग्रहण :-
वेगवेगळ्या भ्रमणकक्षांमध्ये फिरणारे सूर्य,
चंद्र, पृथ्वी जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात
तेव्हा ग्रहण लागते. ही घटना नैसर्गिक आहे.
(१) चंद्रग्रहण :-
▪ अवकाशात जेव्हा सूर्य व चंद्र यांच्या
दरम्यान पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीमुळे
सूर्यप्रकाश अडवला जातो.
▪ यामुळे पृथ्वीची सावली पलीकडे चंद्रावर
पडते, या घटनेस ' चंदग्रहण ' म्हणतात.
▪ चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असेल,तर
त्या ग्रहणास खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.
▪ चंद्राच्या काही भागावरच पृथ्वीची सावली
पडली, तर त्या ग्रहणास खंडग्रास चंद्रग्रहण
म्हणतात.
▪ चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी बघता येतो.
▪ चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशी होतो.
सर्वच पौर्णिमांना चंदग्रहण होत नाही.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment