प्रश्न उत्तर
(१) कळप कोणाचा ? ---- गुरांचा
(२) संघ कोणाचा ? ------ खेळाडूंचा
(३) जुडगा कशाचा ? ---- किल्ल्यांचा
(४) जाळी कशाची ? ---- करवंदांची
(५) मोळी कशाची ? ---- लाकडांची
(६) थवा कोणाचा ? ---- पक्ष्यांचा
(७) जमाव कोणाचा ? ---- माणसांचा
(८) रास कशाची ? --- धान्याची
(९) काफिला कशाचा ? ----- जहाजांचा
(१०) घड कशाचा ? ------ द्राक्षांचा
(११) पलटण कोणाची ? ----- सैनिकांची
(१२) गट कोणाचा ? ----- विद्यार्थ्यांचा
(१३) रांग कोणाची ? ----- मुंग्यांची
(१४) उतरंड कशाची ? ---- मडक्यांची
(१५) बेट कशाचे ? ---- बांबूचे
(१६) गुच्छ कशाचा ? ------ फुलांचा
(१७) गठ्ठा कशाचा ? ---- पुस्तकांचा
(१८) राई कशाची ? -- आंब्याच्या झाडांची
(१९) टोळी कोणाची ? --- चोरांची
(२०) ढीग कशाचा ? --- विटांचा
(२१) भारा कशाचा ? --- गवताचा
(२२) घोळका कशाचा ? --- मुलांचा
(२३) संच कशाचा ? --- वस्तूंचा
(२४) झुबका कशाचा ? -- केसांचा
(२५) वृंद कशाचा ? --- वाद्यांचा
(२६) तांडा कोणाचा ? --- उंटांचा
(२७) अढी कशाची ? --- आंब्याची
(२८) लोंगर कशाचा ? --- केळ्यांचा
(२९)खिल्लार कुणाचा ? --- गाईगुरांचे
(३०) जुडी कशाची ? --- पालेभाजीची
(३१) तुकडी कोणाची ? --- सैनिकांची
(३२) घोस कशाचा ? --- द्राक्षांचा
(३३) थप्पी कशाची ? --- पोत्यांची
(३४) ताटवा कशाचा ? --- फुलझाडांचा
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
धुळे - ९४२२७३६७७५
Chup chutiye
ReplyDelete