माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 4 September 2018

शिक्षक दिन

           दरवर्षी  ५ सप्टेंबर या दिवशी 
 भारतात 'शिक्षक दिन ' साजरा केला जातो.
शिक्षकांवरील प्रेम आदर दाखविण्यासाठी या
 दिनाला विशेष महत्त्व आहे.
   ५ सप्टेंबर हा  भारताचे दुसरे राष्ट्रपती डाॅ.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. ते
जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ होते. विद्यार्थ्यांचे
लाडके शिक्षक होते. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील
भरीव कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून
त्यापासून प्रेरणा घेण्यासाठी साजरा करण्यात
येतो.
       शिक्षक कसा असावा, याचा आदर्श
त्यांनी घालून दिला. काही शिक्षक  आपल्या
बरोबरच्या व अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक
असतात. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा
असेच शिक्षक होते. शिक्षकपण किंवा गुरूपण
हे त्यांच्या पूर्ण शरीरात खिळलेले होते. त्यांचे
ज्ञान सखोल व तत्वनिष्ठ होते. ते नेहमी सांगत,
गुरूपद प्राप्त व्हायचे असेल, तर तत्त्वचिंतक
बना.
        दरवर्षी  ५ सप्टेंबर या दिवशी अनेक
शाळांमध्ये हा दिवस अनेक पध्दतीनी साजरा
केला जातो.  काही शाळांमध्ये या दिवशी
विद्यार्थी शाळा चालवतात. छोट्या विद्यार्थ्यांना
मोठे विद्यार्थी शिक्षक बनून शिकवतात. यातून
शिक्षकांविषयी प्रेम व आदर निर्माण होतो.
      असा हा शिक्षकदिन शाळेत उत्साहाने
पार पडतो.

            शंकर चौरे ( प्रा. शिक्षक)
             धुळे  / ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment