माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 9 September 2018

प्रत्यय जोडून तयार होणारे शब्द

                 मराठी - व्याकरण
 =================================
● खालील शब्द कसे तयार झाले आहेत,
   ते नीट पाहा.

   (१) शेत  + करी   --- शेतकरी
 
   (२) वर्ष  + भर     ---  वर्षभर

● वरील शब्द कसे तयार झाले आहेत  ?

  (१) शेतकरी  -- 'शेत ' या शब्दानंतर  ' करी '
       हा शब्द जोडला आहे.

    (२) वर्षभर -- ' वर्ष ' या शब्दानंतर  ' भर '
        हा शब्द जोडला आहे.

■ मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा शब्द जोडला
    जातो , त्याला प्रत्यय म्हणतात. म्हणून
    ' करी , भर , दार , वान , पण , पणा , ऊन ' हे
    प्रत्यय आहेत.
 
● खालील प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

(१) करी --
      शेतकरी , वारकरी , पहारेकरी , मानकरी ,
      कामकरी ,  गावकरी , कष्टकरी , भाडेकरी .

(२) भर --
     मिनिटभर , तासभर , दिवसभर , महिनाभर ,
     वर्षभर , सालभर , डबाभर , गावभर ,रात्रभर .

(३) दार --
     दुकानदार , जमीनदार , साथीदार , धारदार ,
     शानदार , किल्लेदार , डौलदार ,रुबाबदार .

(४) वान --
     गुणवान , धनवान , बलवान , रूपवान ,
     शीलवान , प्रतिभावान , धैर्यवान , गाडीवान .

(५) पण --
      बालपण , लहानपण , शहाणपण , मोठेपण ,
     
(६) ऊन --
     देऊन , घेऊन , जाऊन , येऊन , खाऊन ,
     पिऊन .

(७) साठी --
     घरासाठी , गावासाठी , देशासाठी , मित्रासाठी ,
     माझ्यासाठी ,  तुझ्यासाठी , शाळेसाठी .

(८) पासून --
   घरापासून , दारापासून , शाळेपासून , नदीपासून ,
    झाडापासून , रस्त्यापासून , वाजेपासून .

(९) वर --
      हातावर ,  झाडावर , टेबलावर , टेकडीवर ,
     फांदीवर , दारावर , पाण्यावर , भिंतीवर .

(१०) कडे --
        घराकडे , नदीकडे , डोंगराकडे , शाळेकडे ,
       माझ्याकडे , तुझ्याकडे ,  समुद्राकडे .

(११) मुळे --
       माझ्यामुळे , तुझ्यामुळे , झाडामुळे , घरामुळे ,
      समाजमुळे , कोणामुळे , मुलामुळे , कशामुळे .
=========================     
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                धुळे  /  ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment