माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 31 January 2022

जोडाक्षरी शब्दांचा मेळ, यमांचा खेळ



नष्ट  = कष्ट
घट्ट  = हट्ट
मस्त = अस्त
रास्त = जास्त
गुप्त = लुप्त
हास्य = दास्य
दृष्टी = वृष्टी
हट्टी  = पट्टी
तृष्णा = कृष्णा
केव्हा = तेव्हा
शुद्ध = युद्ध
किल्ला = बिल्ला
हल्ला = सल्ला
गल्ला = पल्ला
दिल्ली = किल्ली
सळ्या  = नळ्या
गब्बर = जब्बर
पन्हाळा = उन्हाळा
अक्कल = नक्कल
टक्कल = बक्कल
अक्का  = पक्का
सत्तर = उत्तर
को-या  = पो-या
चो-या = गो-या
पु-या = सु-या
खिन्न = भिन्न
मठ्ठ = लठ्ठ
पान्हा  = तान्हा
हत्ती  = बत्ती
रद्दी = हद्दी
थोड्या = जोड्या
वड्या = गड्या
पत्ता = सत्ता
तत्व  = सत्व
तथ्य  = पथ्य
खाद्य = वाद्य
गद्य = पद्य
चक्र  = वक्र
रात्र = मात्र
यंत्र = तंत्र
पुत्र = सुत्र
मंत्री = संत्री
यात्री = कात्री
हर्ष  = वर्ष
सर्प  = दर्प
गर्व  = पर्व
मर्द = गर्द
कर्ज  = अर्ज
तर्क = अर्क
गर्क = वर्क
खर्च = चर्च
धर्म  = कर्म
कार्य  = आर्य
सर्दी  = गर्दी
वर्तन = कर्तन
सार्थ = पार्थ
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता.साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 30 January 2022

माहात्म्य - थोरवी ( समानार्थी शब्द )



थोरवी महिमा माहात्म्य
धन संपत्ती द्रव्य

महा मोठा महान
पुत्र तनय नंदन

प्रणाम अभिवादन नमन
आठवण स्मृती स्मरण

पूजा  सेवा अर्चन
पद पाय चरण

पुष्प फूल सुमन
नमस्कार प्राणिपात वंदन

नेता पुढारी नायक
प्रजा रयत लोक

अन्याय जुलूम अत्याचार
काळजी आस्था फिकिर

कारागृह कैदखाना तुरुंग
समशेर तलवार खड्ग

ध्वज झेंडा निशाण
 खटाटोप धडपड प्रयत्न

राग क्रोध संताप
रोष त्वेष कोप

वैरी शत्रू दुश्मन
वध हत्या खून

रक्त शोणित रूधिर
ईश्वर प्रभू अमर
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक ‌)
       जिल्हा परिषद प्राथमिक - जामनेपाडा
      केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
     ९४२२७३६७७५

Saturday, 29 January 2022

महात्मा गांधी



    महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे नाव मोहनदास गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ला गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. लहानपणी मोहनदास अभ्यासात साधारण होते, पण त्यांच्या मनात आई वडिल व गुरूजनांविषयी अतोनात आदर होता. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू लागले.

     इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात आले. काही दिवस वकिली म्हणून काम केल्यावर एका खटल्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिका येथे जावे लागले. तेथे अनेक भारतीय व्यापारी आणि मजूर रहात होते. त्यांच्यावर फारच अन्याय होत असत. भारतीयांच्या हक्कासाठी अहिंसक लढा दिला. शेवटी त्याचा जय झाला.

    गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा येथे सुध्दा जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली. भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून बाहेर करण्यासाठी सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करण्याचा निर्धार केला. देशासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. गांधींचे संपूर्ण जीवन त्यागाचे होते. म्हणून त्यांना लोक 'बापू' म्हणत. तसेच त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.

    इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अहिंसा, असहकार, स्वदेशीचा वापर या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. 'चले जाव चळवळ, दांडी यात्रा अशा विधायक मार्गाचा वापर करून भारताला १५ आगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.

    देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी झाली. एका देशाचे दोन देश निर्माण झाले. • काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली. ते काळाच्या पडद्याआड गेले.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
   केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
   ९४२२७३६७७५

Friday, 28 January 2022

Essays

(1) THE COW

The cow is a domestic  animal. It has four
legs. It has two horns. It has a long tail. It has two ears and two eyes. The cow eats grass. It is a very useful animal. It gives us milk. Milk is a very good food. A baby cow is a calf. A male cow is a bull.
----------------
E DOG

The dog is a tame  animal. It has four legs, two eyes, two ears and a curved tail. A stray  dog lives anywhere. A pet  dog lives in a kennel. The dog is very useful to us. It barks at strangers  and warns us. It guards our house. It is faithful to us.
-----------------------------------------------------------------------

(3)  THE LION

The lion is a wild animal. It lives in the jungle. It is called the King of beasts. It is very strong. It has big teeth and a big jaw. It has a fine mane. The female lion is called a lioness. The baby lion is a cub. The lion roars very loudly. Its roar can be heard miles away. The lion is a brave animal. It kills and eats other animals. We can see a lion in a circus and in a zoo too. It looks grand and beautiful. We call a brave person a lion.
----------------------------------------------------------------------
(4 ) THE ELEPHANT

The elephant is a very big animal. It has big legs and large ears. But its eyes are small. has a long trunk and long white tusks. It has a small tail. The colour of the elephant is blackish. Its trunk is very useful to it. It raises its trunk and trumpets. It drinks water with the help of its trunk. It can pick up even a very small thing like a pin with its trunk. It can carry heavy loads. The elephants live in groups or herds in the forest. They can be tamed for work. They are trained and used in a circus. It is a very intelligent animal. It is very useful to man. Formerly they were used in wars.
==================================
SHANKAR  SITARAM   CHAURE
z. p. school -- Jamnepada
tal. sakri dist. Dhule
9422736775

Thursday, 27 January 2022

भाषिक - शब्द खेळ (दिलेली अक्षरे जुळवून शब्द तयार करा.)


(१) ना  ळ  र   = नारळ
(२) ळ  भू  जां  = जांभूळ 
(३) प  ळ  पिं   = पिंपळ
(४) पा  क  ळ  = कपाळ 
(५) ळ  बु  बु  = बुबुळ 
(६) आ  ळ  या  = आयाळ 
(७) सा  ळ  के  = केसाळ 
(८) ळ  डू  गां   = गांडूळ 
(९)  र  झु  ळ  = झुरळ
(१०) म  ळ  क  = कमळ 
(११) दू  ळ  तां  = तांदूळ 
(१२) त  ळ  पि  = पितळ
(१३) भा  ळ  आ  = आभाळ
(१४) का  ळ   स  = सकाळ
(१५) ऊ  ळ  दे   = देऊळ
(१६)  र  स  ळ  = सरळ
(१७)  उ  ळ  ख  = उखळ
(१८)  प  ळ  च   = चपळ
(१९) आ  ळा  व  = आवळा
(२०) ळा  व  का  = कावळा
(२१) व  पि  ळा  = पिवळा
(२२) ब  ळा  ग  = बगळा
(२३) भ जां  ळा  = जांभळा
(२४) की को ळा  = कोकीळा
(२५) प  ळा  भो  = भोपळा
(२६) ह  सो   ळा  = सोहळा
(२७ ) व  ळी  च  = चवळी
(२८) सा  ळी  ख  = साखळी
(२९ ) को  पा  ळी  = पाकोळी
(३० ) हा  ळी  ड  = डहाळी
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
       जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
 ‌.    केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
      ९४२२७३६७७५

Wednesday, 26 January 2022

भारत विशेष -- सामान्यज्ञान ( प्रश्नावली )



(१) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणता ?
उत्तर -- १५ ऑगस्ट

(२) भारताचा प्रजासत्ताक दिन कोण़ता ?
उत्तर -- २६ जानेवारी

(३) भारताचा राष्ट्रध्वज कोणता ?
उत्तर -- ‌तिरंगा

(४) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन

(५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हॉकी

(६) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ

(७) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर

(८) भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते ?
उत्तर -- वड

(९) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर -- आंबा

(१०) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ

(११) भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?
उत्तर -- गंगा

(१२) भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते ?
उत्तर -- ताजमहल

(१३) भारताचे राष्ट्रीयगीत कोणते ?
उत्तर --  वंदेमातरम्

(१४) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
उत्तर -- डॉल्फिन मासा 

(१५) भारताची राष्ट्रभाषा कोणती ?
उत्तर -- हिंदी

(१६) आपल्या देशाचे नाव काय  ?
उत्तर -- भारत

(१७) भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य कोणते ?
उत्तर -- सत्यमेव जयते
==============================
संकलक -- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
       केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
      ९४२२७३६७७५

भाषेचे मूलभूत घटक



१. वर्ण --
आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात.

--------------------------------------
२. अक्षर --
 - ध्वनीच्या किंवा आवाजाच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.
अक्षर = कधीही नष्ट न होणारे

---------------------------------------
३. स्वर --
 - ओठांचा किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनि बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात.

---------------------------------------
४. शब्द --
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर त्यांना शब्द असे म्हणतात.

----------------------------------------
५. वाक्य --
- अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात.

---------------------------------------
६. व्याकरण --
 - भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.

----------------------------------------
काही महत्त्वाचे -
१. मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या ४८ होती तर आधुनिक वर्णमालेत ती ५२ इतकी आहे .

२.ऋ,लृ या स्वरांचा चौदाखडीत समावेश होत नाही.

३. पुढील वर्ण भविष्यात नष्ट होऊ शकतात - ऋ,लृ ,ञ

४.र् या वर्णाला  कंपित वर्ण असे म्हणतात, कारण याचा उच्चार करताना कंपन होते.

५. वर्णमालेतील ऑ ,ॲ  हे इंग्रजी स्वर आहेत.
========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्राथमिक शिक्षक )
जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday, 25 January 2022

आपला देश -- सामान्यज्ञान ( प्रश्नावली)



(१) आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत.

----  राष्ट्रीय सणांतून नागरिकांत एकात्मतेची भावना निर्माण होतें. राष्ट्रीय सण साजरे केल्याने ही एकात्मतेची भावना टिकून राहते व जोपासली जाते. या ऐक्यभावनेमुळे देशाची प्रगती होते. म्हणून आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत.
-----------------------------------------------------

(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 

---- आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास २६ जानेवारी १९५० पासून सुरुवात झाली. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
-----------------------------------------------------

(३) प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोण कोण सहभागी होतात?

----- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात : (१) भूदल, नौदल आणि हवाईदल देशाची तीन संरक्षक दले (२) विविध राज्यांतील काही विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्रसे निवडक विद्यार्थी (३) ज्या विद्यार्थ्यांना शौर्यपदके मिळाली आहेत असे विद्यार्थी हे सर्वजण सहभागी होतात.
-----------------------------------------------------

(४) राष्ट्रीय प्रतीकांतून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?

 ----- (१) राष्ट्रीय प्रतीकांतून राष्ट्राबद्दलचे प्रेम व्यक्त होते. (२) नागरिकातील ऐक्यभावना बळकट होते. या गोष्टी राष्ट्रीय प्रतीकांतून साध्य होतात.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
            केंद्र - रोहोड,  ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

प्रसिद्ध शहरांची ओळख



१) गुलाबी शहर --- जयपूर

२) भारताचे उद्यान, संगणक शहर -- बंगळूर

३) भारताचे नंदनवन -- काश्मीर 

४) पंच नद्यांचा प्रदेश --  पंजाब

५) मसाल्याच्या पदार्थांची बाग -- केरळ

६)  अरबी समुद्राची राणी -- कोची (कोचीन)

 ७)  विद्येचे माहेरघर --- पुणे

८) सात बेटांचे शहर  --- मुंबई

९) भारताचे प्रवेशद्वार  --- मुंबई

१०) भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

११) राजवाड्यांचे शहर --  कोलकाता

१२) देवळांचे शहर -- भुवनेश्वर

१३) सरोवरांचे शहर  --- उदयपूर

१४)  सुवर्ण मंदिराचे शहर --- अमृतसर
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
         केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
        ९४२२७३६७७५

Sunday, 23 January 2022

विरूद्धार्थी शब्द साखळी



दूर × जवळ
वाकडे  × सरळ
मंद  × चपळ
खोल × उथळ
दाट  ×  विरळ
घट्ट × पातळ
आकाश  × पाताळ
रागीट  × प्रेमळ
सुकाळ  × दुष्काळ
क्षणिक  × चिरकाळ
मळका  × निर्मळ
कर्कश  × मंजूळ
घाऊक × किरकोळ
अबोल × वाचाळ
टिकाऊ  × ठिसूळ
सबळ  × दुर्बळ
तिरपा  × सरळ
गच्च  × विरळ
क्रूर  × प्रेमळ
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
       जिल्हा परिषद शाळा प्राथमिक - जामनेपाडा
        केंद्र - रोहोड,  ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

Friday, 21 January 2022

व्यावहारिक परिमाणे ( गणितीय सामान्यज्ञान ‌)



१ डझन = १२ वस्तू
१  तास = ६० मिनिटे
१ मिनिट = ६० सेकंद
१ तास = ३६०० सेकंद
१ दिवस = २४ तास
१ मीटर = १०० सेंटिमीटर
१ किलोमीटर  = १००० मीटर
१ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
१ लीटर = १००० मिलिलीटर
१ क्विंटल = १०० किलोग्रॅम
१ टन = १००० किलोग्रॅम
१ फूट  = १२  इंच
१ आठवडा = ७ दिवस
१ दिवस = ८६,४०० सेकंद
१ महिना  =  ३० / ३१ दिवस
१ वर्ष  = ३६५  / ३६६ दिवस
१ तोळा  = १० ग्रॅम.
१ रीम = ४८० कागद
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
         जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
       केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

OPPOSITE WORDS ( ऑपोझीट वर्डस ) विरूद्धार्थी शब्द



cold  x  hot  
dry   x  wet

in  x  out
rise  x  set

thin   x  fat
end   x  start

day  x night
dark  x light

slow  x  fast
work  x rest

right  x left
hard  x  soft

tall  x short
this  x   that

loss  x  profit
wrong  x  right

bitter  x  sweet
first  x  last
=====================
Shankar  Sitaram Chaure
z. p. school - Jamnepada
tal. sarki , dist - Dhule
9422736775

Wednesday, 19 January 2022

शब्दांची जोड ---- शब्दांची फोड



✓  जोडशब्द / सामासिक शब्द वाचा व शब्दांची फोड करून लिहा.
(१) दरसाल  --- प्रत्येक वर्षी
(२) हररोज  --- प्रत्येक दिवशी
(३) दररोज  --- प्रत्येक दिवशी
(४) घरोघरी  ---  प्रत्येक घरी
(५) पानोपानी --- प्रत्येक पानात
(६) गल्लोगल्ली  --- प्रत्येक गल्लीत
(७) दारोदार --- प्रत्येक दारी
(८) जागोजागी  --- प्रत्येक जागी
(९) गायरान --- गाईंसाठी रान
(१०) राजवाडा --- राजाचा वाडा
(११) वनभोजन  ---  वनातील भोजन
(१२) लालभडक --- खूप लाल
(१३) नापसंत  --- पसंत नसलेला
(१४) बेकायदा  --- कायदेशीर नसलेला
(१५) अनादर  --- आदर नसलेला
(१६) नाइलाज  --- इलाज नसलेला
(१७) निर्दोष  --- दोष नसलेला
(१८) अशक्य  --- शक्य नसलेला
(१९) अयोग्य  --- योग्य नसलेला
(२०) बेसावध  --- सावध नसलेला
(२१) हिरवागार --- खूप हिरवा
(२२) नवरात्र --- नऊ रात्रीचा समूह
(२३) पुरणपोळी -- पुरण घालून केलेली पोळी
(२४) मावसभाऊ --- मावशीचा मुलगा
(२५) बहीणभाऊ --- बहीण व भाऊ
(२६) आईवडील --- आई आणि वडील
(२७) स्त्रीपुरुष  --- स्त्री आणि पुरुष
(२८) पंधरासोळा --- पंधरा किंवा सोळा
(२९) मागेपुढे  --- मागे किंवा पुढे
(३०) खरेखोटे  --- खरे किंवा खोटे
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद शाळा प्राथमिक जामनेपाडा
     केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
     ९४२२७३६७७५

भूमिती ( भौमितिक माहिती )



(१) त्रिकोण
---  त्रिकोणाला तीन बाजू व तीन शिरोबिंदू असतात.

(२) आयत
---  आयताला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.

(३) चौरस
---  चौरसाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.

(४) चौकोन
--- चौकोनाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.

(५) आयताची परिमिती
---  आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आयताची परिमिती होय.

(६) चौरसाची परिमिती
---  चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती होय.

(७) त्रिकोणाची परिमिती 
---  त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती होय.
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
            जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
            केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
            ९४२२७३६७७५

Monday, 17 January 2022

महाराष्ट्र -- सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ?
उत्तर -- राज्य

(२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६

(३) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र

(४)आपण महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतो ?
उत्तर --. १ मे

(५) भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे ?
उत्तर -- पश्चिम

(६) महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग पाडले आहेत ?
उत्तर -- सहा

(७)  महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई

(८) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती  ?
उत्तर --  नागपूर

(९) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर

(१०) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर

(११) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
              जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
             ९४२२७३६७७५

Sunday, 16 January 2022

भाषिक शब्द खेळ ( ' प्र ' चे शब्दनिर्मिती )



✓ दिलेल्या शब्दाच्या सुरूवातीस  ' प्र ‌' अक्षर जोडून नवीन शब्द तयार करणे.

कट  --- प्रकट
खर  --- प्रखर
सर  ---  प्रसर
हर  ---- प्रहर
गट  --- प्रगट
बळ  --- प्रबळ
लय  --- प्रलय
हार  --- प्रहार
चार  --- प्रचार
भात  --- प्रभात
घात  --- प्रघात
ताप --- प्रताप
धान  --- प्रधान
कार  --- प्रकार
सार  --- प्रसार
भाग  --- प्रभाग
भाव  --- प्रभाव
दान  --- प्रदान
वास  --- प्रवास
साद  --- प्रसाद
देश  --- प्रदेश
कोप  --- प्रकोप
दोष  ---  प्रदोष
पंच  --- प्रपंच
बोध  --- प्रबोध
मुख  --- प्रमुख
योग  --- प्रयोग
संग  ---  प्रसंग
शांत  --- प्रशांत
वचन  --- प्रवचन
करण  --- प्रकरण
भाकर  --- प्रभाकर
शासन --- प्रशासन
दर्शन  --- प्रदर्शन
शिक्षण  --- प्रशिक्षण
दीर्घ  --- प्रदीर्घ
दक्षिणा  --- प्रदक्षिणा
क्रिया --- प्रक्रिया
भावी  --- प्रभावी
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद शाळा -- जामनेपाडा
          केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

मानवी शरीर -- आंतरिंद्रियांची कार्य ( मेंदू , ह्रदय, फुप्फुस )



(१) मेंदूचे कार्य कोणते ?

----- (१) शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्यांचे नियंत्रण मेंदू करतो. (२) अवयवांच्या कामांमध्ये सुसूत्रता ठेवण्याचे कामही मेंदू करतो. (३) आपल्या सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूस मिळत असते. त्यानुसार मेंदू शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आज्ञा पाठवतो. (४) विचार करणे, स्मरण ठेवणे आणि निर्णय घेणे ही कामे मेंदू करतो.
===========================

(२) हृदय कोणते कार्य करते?

-----  रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करते. त्यासाठी हृदयाचे सतत
आकुंचन-प्रसरण होत राहते. रक्ताची हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून हृदयाकडे ने-आण करण्याचे काम हृदय करते.
===========================

(३)!फुप्फुसाचे कार्य कोणते?

------  श्वास घेऊन नाकावाटे बाहेरच्या हवेतील ऑक्सिजन फुप्फुसांमध्ये रक्तात मिसळणे आणि श्वास सोडून फुप्फुसातील हवेबरोबर रक्तामधील कार्बन डायऑक्साइड शरीराबाहेर पाठवणे हे फुप्फुसाचे कार्य आहे.
=============================
संकलन  :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
             जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
            केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Saturday, 15 January 2022

म्हणजे काय ? ( ' ळ ' ची साखळी )



मंदिर म्हणजे देऊळ
स्वच्छ म्हणजे निर्मळ
कोयल म्हणजे कोकीळ
नारळ म्हणजे श्रीफळ

पंकज म्हणजे कमळ
मस्तक म्हणजे कपाळ
आकाश म्हणजे आभाळ
गंध म्हणजे परिमळ

बैल म्हणजे पोळ
शक्ती म्हणजे बळ
क्रीडा म्हणजे खेळ
वेदना म्हणजे कळ

अवर्षण म्हणजे दुष्काळ
मुबलक म्हणजे पुष्कळ
मोहिनी म्हणजे भुरळ
उषा म्हणजे सकाळ

ललाट म्हणजे निढळ
राजा म्हणजे भूपाळ
देवालय म्हणजे राऊळ
दु:खी म्हणजे व्याकूळ

त्रास म्हणजे छळ
दुर्जन म्हणजे खळ
यातना म्हणजे शूळ
समय म्हणजे वेळ

रांग म्हणजे ओळ
अंतरिक्ष म्हणजे अंतराळ
काळजी म्हणजे कळकळ
घास म्हणजे कवळ
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि.‌धुळे
           ९४२२७३६७७५

Friday, 14 January 2022

लहान काय ?




✓ एकच विशेषण अनेक नामांना लावता येते.

लहान मुंगी
लहान मांजर
लहान कुत्रा
लहान ससा
लहान आरसा
लहान झुरळ
लहान माकड
लहान शेपूट
लहान कासव
लहान साप
लहान बेडूक
लहान मासा
लहान बोकड
लहान मुलगा
लहान फणस
लहान कुलूप
लहान घड्याळ
लहान बादली
लहान टेबल
लहान कपाट
लहान बरणी
लहान टोपली
लहान दगड
लहान पिशवी
लहान ब्रश
लहान बाहुली
लहान चटई
लहान लाडू
लहान दुकान
लहान झोपडी
लहान हाॅटेल
लहान देश
लहान पंखा
लहान नदी
लहान टेकडी
लहान पणती
लहान गाडी
लहान खेडे
लहान गोळी
लहान समई
लहान दिवा
लहान ढीग
लहान पान
लहान खोली
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
            जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
            केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि.. धुळे
            ९४२२७३६७७५



Wednesday, 12 January 2022

भाषिक उपक्रम ( दिलेल्या शब्दाला 'णे '‌ अक्षर लावून शब्द तयार करणे.)



आण ------- आणणे
बांध -------- बांधणे
वाट -------- वाटणे
धर --------- धरणे
झेल -------- झेलणे
लढ -------- लढणे
जळ -------- जळणे
दळ --------- दळणे
ठेव --------- ठेवणे
भेट --------  भेटणे
ऐक -------- ऐकणे
विक -------- विकणे
सांग -------- सांगणे
जोड --------- जोडणे
टांग --------- टांगणे
झोप --------- झोपणे
वाच --------- वाचणे
बोल -------- बोलणे
झाड --------- झाडणे
लाव -------- लावणे
काप --------- कापणे
कर ---------- करणे
चाव --------- चावणे
ओढ ---------- ओढणे
चिर ----------- चिरणे
लप ----------- लपणे
शिव ---------- शिवणे
पाह --------- पाहणे
चोर ----------- चोरणे
फेक ---------- फेकणे
बुड ---------- बुडणे
फाड --------- फाडणे
रड ---------- रडणे
खेळ --------- खेळणे
राह ----------- राहणे
बस ---------- बसणे
शिक ---------- शिकणे
थांब ------------ थांबणे
साध ----------- साधणे
म्हण ---------- म्हणणे
जग ----------- जगणे
शोध ----------- शोधणे
ओत ---------- ओतणे
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
        केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

भारताची राष्ट्रीय सन्मानचिन्हे



(१) राष्ट्रगीत :
● 'जन-गण-मन....' हे भारताचे राष्ट्रगीत आहे.
● हे राष्ट्रगीत नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे.
● राष्ट्रगीत ५२ सेकंदात गायला हवे.
●  १९११ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात राष्ट्रगीत प्रथम गायिले गेले.
● 'राष्ट्रगीत' हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.
-----------------------------------------------------
(२) राजमुद्रा : 
● 'राजमुद्रा' हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. 
●  सम्राट अशोकने सांची येथे उभारलेला चार सिंहांनी युक्त स्तूप भारताची राजमुद्रा आहे.
● या चार सिंहांपैकी एक सिंह दिसत नाही. 
● राजमुद्रेच्या खाली डाव्या बाजूस घोडा तर उजव्या बाजूस बैल आहे. मधोमध अशोकचक्र आहे.
● राजमुद्रेच्या खालील बाजूस 'सत्यमेव जयते' हे वाक्य देवनागरी लिपीत कोरले आहे. 
● राजमुद्रा भारताच्या सर्व कागदपत्रांवर उमटवलेली असते. (उदा. नोटा, नाणी, स्टँप इत्यादी). 
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
          जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
        केंद्र - रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

Monday, 10 January 2022

सुंदर काय ? (एकच विशेष अनेक नामांना लावता येते.)



सुंदर फूल
सुंदर मुलगी
सुंदर बाळ
सुंदर स्त्री
सुंदर डोळे
सुंदर चेहरा
सुंदर घर
सुंदर साडी
सुंदर चोळी
सुंदर कोट
सुंदर शर्ट
सुंदर चित्र
सुंदर मूर्ती
सुंदर वासरू
सुंदर शाळा
सुंदर देऊळ
सुंदर पक्षी
सुंदर मोर
सुंदर कबतूर
सुंदर बगळा
सुंदर कावळा
सुंदर कोकीळा
सुंदर गाव
सुंदर टोपी
सुंदर झोपडी
सुंदर झरा
सुंदर रान
सुंदर भाषा
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
         केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
         ९४२२७३६७७५

Sunday, 9 January 2022

भौगोलिक प्रश्नावली (परिसर अभ्यास )



(१) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
-----------------------------
(२) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर
------------------------------
(३) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे  ?
उत्तर -- ७२०
---------------------------------------------------
(४) महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किना-याजवळ कोणता व्यवसाय चालतो ?
उत्तर -- मासेमारी
---------------------------------------------------
(५) मासे टिकवण्यासाठी कशाचा वापर करतात ?
उत्तर -- मीठ
---------------------------------------------------
(६) मासे टिकवण्यासाठी काय करतात ?
उत्तर -- खारवतात
---------------------------------------------------
(७) मासळी कशाला म्हणतात ?
उत्तर -- माशांना
---------------------------------------------------
(८) पृथ्वीवरील खा-या पाण्याच्या साठ्याला काय म्हणतात ?
उत्तर -- सागर / समुद्र
---------------------------------------------------
(९) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी
---------------------------------------------------
(१०) गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर -- दक्षिण
---------------------------------------------------
(११) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
---------------------------------------------------
(१२) तापी नदी कोणत्या दिशेला वाहते  ?
उत्तर -- पश्चिम
---------------------------------------------------
(१३) तापी नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते ?
उत्तर -- अरबी
---------------------------------------------------
(१४) अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
उत्तर -- रायगड
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
        केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
      ९४२२७३६७७५

Friday, 7 January 2022

वनस्पती विषयी महत्त्वपूर्ण माहिती.



(१) वृक्ष : --
 ---खूप उंच वाढणाऱ्या टणक, मजबूत खोड असलेल्या वनस्पतींना वृक्ष म्हणतात. उदा. आंबा, वड, ताड, माड, जांभूळ.

(२)  झुडूप :--
---- टणक व मजबूत खोडाच्या, पण मध्यम उंचीच्या वनस्पतींना झुडुप म्हणतात. (उंची २ ते ३ मी.) उदा. संत्रे, लिंबू, जास्वंद, कण्हेर.

(३) वेल : --
---- कमकुवत खोड असणाऱ्या, आधाराने वाढणाऱ्या वनस्पतींना वेली म्हणतात. उदा. कारले, घोसाळे, काकडी, भोपळा, द्राक्षे, दोडका.

(४) रोपटे : --
---- मऊ आणि लवचीक खोड असलेल्या वनस्पतींना रोपटे म्हणतात. (उंची १ ते १.५ मी.)
----------------------------------------------

✓• वनस्पतींच्या कालावधीवरून केलेले वर्गीकरण :

●   बहुवार्षिक वनस्पती :--
---- ज्या वनस्पती अनेक वर्षे जगतात, त्या वनस्पतींना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात. उदा. वड, पिंपळ, कडुनिंब, साग, नारळ, जांभूळ.

● द्विवार्षिक वनस्पती : --
---- ज्या वनस्पतींचे आयुष्य दोन वर्षांत पूर्ण होते, त्या वनस्पतींना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. उदा. मुळा, गाजर, बीट.

● वार्षिक वनस्पती :--
 ---- ज्या वनस्पतींचे जीवनचक्र एक वर्षात संपते, त्या वनस्पतींना वार्षिक वनस्पती म्हणतात. उदा. सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका, तीळ.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
            ता. साक्री, जि. धुळे
            ९४२२७३६७७५

खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.(विषय - परिसर अभ्यास )

१)कोळी किड्याला चार असतात.
उत्तर -- चूक

(२) सर्वाधिक वेगाने धावणारा पक्षी शहामृग आहे.
उत्तर -- बरोबर

(३) साप, गांडूळ हे प्राणी पायांनी चालतात.
उत्तर -- चूक

(४) कोळी किड्याला आठ पाय असतात.
उत्तर -- बरोबर

(५) माशाला पाय असतात .
उत्तर -- चूक

(६) गांडूळ व साप यांना पाय नसतात .
उत्तर -- बरोबर

(७ ) माकडे निवारा बनवत नाही.
उत्तर -- बरोबर

(८) मासे परांची हालचाल करुन पाण्यात पोहतात.
उत्तर -- बरोबर

(९) पक्ष्यांना दात नसतात.
उत्तर -- बरोबर

(१०) जांभूळ या फळात अनेक बिया असतात.
उत्तर -- चूक

(११) आ़बा या फळात एकच बी असते .
उत्तर -- बरोबर

(१२) सीताफळ या फळात एकच बी असते.
उत्तर -- चूक

(१३) फूलपाखरे अन्न चावून खातात.
उत्तर -- चूक

(१४) सीताफळ या फळात अनेक बिया असतात.
उत्तर -- बरोबर

(१५) फुलपाखरे पातळ अन्न सोंडेने शोषून घेतात.
उत्तर -- बरोबर

(१६) सगळ्या वनस्पतींची पाने सारखी नसतात.
उत्तर -- बरोबर
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद‌ प्राथमिक शाळा - जामनेपाडा
       केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

Thursday, 6 January 2022

मराठी शब्दसौंदर्य (शब्द संपत्ती )



जा --  जाता, जात, जाताना, जाऊन, जाणे

खा --- खाता, खात, खाताना, खाऊन, खाणे.

रड -- रडणे, रडत, रडताना, रडून, रडता, रडवे.

फुग --  फुगणे, फुगत, फुगताना, फुगून, फुगता.

नट -- नटणे, नटत, नटून, नटवे, नटताना

गा --  गाणे, गाता, गाताना, गाऊन, गात.

फस -- फसणे, फसत, फसताना, फसून, फसवे.

हस -- हसणे, हसत, हसता, हसून, हसते, हसताना 

बुड --  बुडणे, बुडता, बुडवे, बुडते, बुडताना, बुडत.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Wednesday, 5 January 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर -- गंगा

(२) भारतातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राज्य कोणते ?
उत्तर -- राजस्थान

(३) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- थरचे वाळवंट ( राजस्थान )

(४) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर --  गोवा

(५) भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तर -- ‌मौसिनराम (मेघालय )

(६) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद

(७) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?
उत्तर -- इंदिरा गांधी

(८) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू

(९) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण  ?
उत्तर --  प्रतिभाताई पाटील

(१०) भारतातील पहिली स्त्री शिक्षिका कोण‌ ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले

(११) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसुबाई

(१२) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी कोणती ?
उत्तर -- ‌गोदावरी
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
            जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
           ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५
          

Tuesday, 4 January 2022

Tell the rhyming words that end with ' l ' ( ' l ' अक्षराने शेवट होतात असे यमक जुळणारे शब्द सांगा.)



ball call  tall (बाॅल काॅल टाॅल)

wall  hall  fall (वाॅल हाॅल फाॅल)

bell  tell fell ( बेल टेल फेल )

sell  jell  well (सेल जेल वेल  )

hill mill will  (हील मील वील )

bill  fill  kill  (बील फील कील)

nill  pill  dill (नील पील डील )

pull  bull  full (पूल बूल  फूल)

rail  jail  mail (रेल  जेल मेल)

coil  soil  boil  (काॅईल साॅईल  बाॅईल)

cool  fool  pool (कुल फुल  पूल)

feel  heel  peel  (फिल  हिल पील)

meal  seal  deal ( मील सील डील )
==========================
SHANKAR. SITARAM  CHAURE
z. p. school - jamnepada 
tal. sakri dist dhule
9422736775

Sunday, 2 January 2022

सावित्री तुझ्यामुळेच ........


सावित्री तुझ्यामुळेच मी शाळेत जाते.
सावित्री तुझ्यामुळेच मी वाचन करते
सावित्री तुझ्यामुळेच मी लेखन करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी भाषण करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी नेतृत्व करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
सावित्री तुझ्यामुळेच मी जागरूक झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी ज्ञानी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी स्वावलंबी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी जबाबदार झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कष्टाळू झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कार्यतत्पर झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी धीट झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी सुसंस्कृत झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी सुखी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी अभिमानी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी प्रेरणादायी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी राष्ट्रपती झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली.
सावित्री तुझ्यामुळेच माझी प्रगती झाली.
सावित्री तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली

लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
           जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
           केंद्र- रोहोड ता.साक्री जि.धुळे
           ९४२२७३६७७५


भारताचे राष्ट्रीय सन्मानचिन्ह --- राष्ट्रध्वज



राष्ट्रध्वज 

●आपल्या देशाचा राष्ट्रध्वज अशोक चक्रांकित तिरंगा आहे. 

● राष्ट्रध्वज हे भारताचे पहिले राष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे.

● केशरी (वरच्या बाजूला) पांढरा (मध्ये) आणि हिरवा (खालच्या बाजूला) असे तीन रंगाचे समान पट्टे असतात.

●राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी ३:२ प्रमाणात असते. 

● अशोक चक्र निळ्या रंगाचे असून त्याला २४ आरे असतात.

 ● केशरी रंग :-- त्याग, बलिदान, तपस्या, धैर्य यांचे प्रतीक.

 ● पांढरा रंग :-- सत्य, शांतता, पावित्र्य यांचे प्रतीक.

● हिरवा रंग :-- समृद्धतेचे प्रतीक.

● अशोक चक्र :-- निळ्या रंगाचे धर्मचक्र. सत्य धर्माचे आचरण करणारा संदेश.

● २४ आरे :-- चोवीस तास सतत धर्मानुसार गतिमान.

● राष्ट्रध्वज रचना समिती :-- पंडित नेहरू, सरदार पटेल इत्यादी सात सदस्य.

● घटना समितीने राष्ट्रध्वजास २२ जुलै १९४७ रोजी संमती दिली.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


.

Saturday, 1 January 2022

एका शब्दात उत्तरे सांगा.



१)सूर्योदयाची दिशा कोणती ?
-----  ‌‌पूर्व

(२) सूर्यास्ताची दिशा कोणती ?
----- पश्चिम

(३) उत्तर दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- दक्षिण

(४) दक्षिण दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- उत्तर

(५) भारताच्या दक्षिण दिशेस असणारा महासागर कोणता ?
----- हिंदी

(६) भारताच्या पश्चिमेस असणारा समुद्र कोणता ?
----- अरबी

(७) भारताच्या पूर्वेस असणारा उपसागर कोणता ?
------ बंगाल

(८) मुख्य दिशा किती ?
----- चार

(९) साठ सेकंदाच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ मिनिट

(१०) साठ मिनिटांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- तास

(११) चोवीस तासांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- दिवस

(१२) सात दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- आठवडा

(१३) पंधरा दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
---- पंधरवडा

(१४) तीस दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ महिना

(१५) बारा महिन्यांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- वर्ष
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५