माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 30 January 2018

उपक्रम :- पाहुणा कोण  ?


उद्देश :- दिलेल्या घटकात न बसणारा शब्द
           ओळखणे.

 सूचना:-खाली काही घटक दिलेले आहेत.
        जसे - नाम,  विशेषण, समानार्थी
        शब्द. प्रत्येक घटकात एक एक शब्द
        त्या घटकात बसणारा नाही. त्यास
        शोधा. हा खेळ कितीही मुलांत खेळता
        येईल. जो अचूक उत्तरे देईल तो जिंकेल.

  (१) सुमित, तुषार, हुशार, सुप्रिया.

  (२) गोड, गूळ, कडू , खारट.

   (३) आई,  माय,  बाप,  माता.

   (४) पाणी,  दगड, जल, जीवन.

   (५) हिमालय, सह्याद्री, उंच, सातपुडा.

    (६) नाम, सर्वनाम, भूतकाळ,  क्रियापद.

   (७) तुम्ही,  गोरे,  आम्ही,  आपण.

   (८) खातो, पितो, करतो, राजू.

   (९)घरदार, गणपत, नफातोटा, तिखटमीठ

   (१०) माती,  मार्ग,  रस्ता,  वाट.

   (११) अरण्य, वन, तापी,  जंगल.

   (१२)भारत, अमेरिका, महाराष्ट्र, चीन.

   (१३) आरती, उमेश, भारती, कीर्ती.

   (१४) काळी,  पाटी,  वही,  पुस्तक,

   (१५) नर्मदा, दयाळू , गंगा, गोदावरी.
==========================
 उत्तरे :- (१) हुशार, (२) गूळ ४ बाप
 (५) दगड  (६)उंच (७) भूतकाळ (८)गोरे
(९)राजू (१०)गणपत(११)माती(१२) तापी
(१३)महाराष्ट्र (१४)काळी (१५)दयाळू

 

पाळीव प्राण्यांची थोडक्यात माहिती


(१) गाय --
  गाय पाळीव प्राणी आहे. गाईचा रंग
  पांढरा,तांबूस किंवा काळा असतो.
  तिला दोन शिंगे असतात. तिचे शेपूट
  गोंडेदार असते. गाईचे डोळे काळेभोर
  व टपोरे असतात. गाय हा खूप उपयुक्त
  प्राणी आहे. गाईपासून आपल्याला दूध
   मिळते.

(२) बैल --
    बैल हा पाळीव प्राणी आहे. त्याचे डोळे
    टपोरे असतात. त्याला दोन शिंगे व
    गोंडेदार शेपूट असते. तो काळ्या,पांढर्‍या
    किंवा तांबूस रंगाचा असतो. तो खूप
    ताकदवान असतो. नांगराला बैल जोडतात.
    बैल नांगर ओढत असतो.

(३) घोडा --
    घोडा हा पाळीव प्राणी आहे. तो देखणा,
    रुबाबदार व मजबूत असतो. घोडा हा
    काळ्या, पांढर्‍या किंवा तांबूस रंगाचा
    असतो. त्याच्या पायांना खूर असतात.
    त्यांना पोलादी नाल ठोकलेली असते.
    घोडा खूप जलद पळतो.

(४) मांजर --
     मांजर हा पाळीव प्राणी आहे.त्याच्या
     अंगावर मऊ केस असतात. त्याचे डोळे
     घारे असतात. मांजराला मिशाही असतात.
     मांजर पांढर्‍या, काळ्या, सोनेरी किंवा
     करड्या रंगाचे असते. ते म्याव् म्याव्
     ओरडते.

(५) उंट --
     उंट हा पाळीव प्राणी आहे. उंटाचे पाय
     खूप उंच असतात. त्याची मान लांब
    असते. पण तोंड आणि कान अगदी
     लहान असल्यामुळे उंट फार विचित्र
    व कुरूप दिसतो. त्यांच्या पाठीवर उंचवटा
    असतो. त्याला मदार म्हणतात. त्याचा
     रंग मळकट असतो. वाळवंटातील लोकांना
    उंटाचा फार उपयोग होतो.

  लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                 📞९४२२७३६७७५

Thursday, 25 January 2018

फक्त नावे सांगा


(१)परांची हालचाल करून पाण्यात
     पोहणारे प्राणी  -- *मासे*

(२)जमिनीवर चालणारे आणि हवेत
     उडणारे प्राणी  -- *पक्षी, झुरळ*.

(३)पायांशिवाय सरपटत जाणारे प्राणी.
     --  *साप, गांडूळ*.

(४)लहान पायांनी सरपटत चालणारे
    प्राणी  --- *सरडा, पाल, कासव*.

(५)चार पायांनी टुणटुण उड्या मारत
    चालणारे प्राणी.  -- *ससा, बेडूक*.

(६) चार पायांनी जमिनीवर चालणारे
    अथवा धावणारे प्राणी -- *कुत्रा,  बैल*.

(७)आकाराने सर्वांत मोठा पक्षी -- *शहामृग*.

(८)वेगाने धावणारा पक्षी -- *शहामृग*.
--- s.  s. chaure ----------------------------

(९)शिंगे असणारे प्राणी -- *हरिण, गाय,गेंडा*.

(१०)आठ पायांचा किडा  --  *कोळी*.

(११)मातीचे कण रचून वारूळ बनवणारे
        प्राणी  -- *मुंग्या*.

(१२)घरटी न बांधणारे पक्षी  -- *कोकिळ*,
        *कोंबडी*.

(१३)अन्न जिभेने पकडणारा आणि न
       चावता गिळणारा प्राणी -- *सरडा*.

(१४)लोकर मुख्यतः या प्राण्यांच्या अंगावरील
      केसांपासून बनवली जाते.  -- *मेंढी*.

(१५) रवंथ करणारे प्राणी  -- *गाय,  म्हैस*.

  संकलक :- *शंकर चौरे*(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

पक्ष्यांची थोडक्यात माहिती


   

(१) मोर -
मोर हा फारच सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग
चमकदार हिरवा -निळा असतो. त्याच्या
डोक्यावर सुंदर तुरा असतो. पण त्याचे
पाय कुरूप व उंच असतात. मोराचा
पिसारा वजनदार व लांबलचक असतो.
मोर पावसात पिसारा फुलवतो आणि
नाचतो. तेव्हा तो फारच सुंदर दिसतो.
मोर रानात राहतो. तो धान्य व कीटक
खातो. तो फार उंच उडू शकत नाही.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

----------------------------------------

*(२) पोपट -*
पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग
हिरवागार असतो. त्याची चोच लालभडक,
बाकदार व धारदार असते. त्याच्या गळ्या-
भोवती काळी रेघ असते.त्याला कंठ
म्हणतात. पोपट झाडाच्या ढोलीत राहतो.
-----------shankar chaure ------

*(३) कावळा -*
कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे.
त्याचा रंग काळाकुट्ट असतो. मानेजवळचा
भाग मात्र करडा असतो. त्याची चोच
खूप मोठी असते. त्याचा आवाज कर्कश
असतो. तो कावकाव ओरडतो. तो खूपच
चलाख असतो. कावळा उंचावर घरटे
बांधतो. तो अळ्या,किडे आणि जे इतर
काही मिळेल ते खातो. लहान मुलांना
हा पक्षी फारच आवडतो.
--------------------------------------------

(४) कोंबडा -
कोंबडा हा पाळीव पक्षी आहे. तो फार
उंच उडू शकत नाही. मुख्यतः तो चालतोच
त्याचे चालणे ऐटबाज असते. कोंबडे
पांढर्‍या, काळ्या किंवा तपकिरी व मिश्र
रंगाचे असतात.कोंबड्याची चोच टोकदार
असते. पाय उंच असतात. त्याच्या डोक्यावर
लालभडक तुरा असतो. तो दिवसभर
इकडेतिकडे फिरत असतो. मातीतील
धान्याचे कण व किडे हे त्याचे अन्न असते.
कोंबड्याच्या ओरडण्याला आरवणे
म्हणतात.
---------------------------------------------

(५) चिमणी -
चिमणी हा पक्षी सर्वत्र आढळतो. चिमणी
हा अगदी छोटासा पक्षी आहे. चिमणीचा
रंग करडा असतो. इवल्याशा चोचीने ती
पटपट दाणे टिपते. तिचे पंख इवलेसे व
पायही इवलेसे असतात. ती एक-एक पाय
टाकत कधी चालत नाही. ती टुणटुण उड्या
मारत चालते. चिमणी चिवचिव आवाज
काढून इकडेतिकडे भुर्रकन उडत फिरते.
लहान मुलांना चिमणी फार आवडते.
       
 लेखन :-  शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
             जि.प.शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि.धुळे
              📞 ९४२२७३६७७५
  

सम संख्या आणि विषम संख्या याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 

(१) सम संख्यांची बेरीज सम संख्याच असते.
  
        उदा.   ४+२ =६
                 ८+४=१२

(२)सम संख्यांची वजाबाकी सम संख्याच असते.

        उदा. १२ - ८ =४
               ३२ - १६=१६

(३)सम संख्यांचा गुणाकारही सम संख्याच
    असतो.
         उदा. २ × ४ =८
                ८ ×२ =१६

(४)दोन विषम संख्यांची बेरीज सम संख्या
     असते.
            उदा. ९ + ११ = २०

(५)दोन विषम संख्यांची वजाबाकी सम संख्या
     असते.
              उदा.  ११ - ३ =८
                      २७ - १५ = १२

(६) तीन किंवा पाच विषम संख्यांची बेरीज मात्र
      विषम संख्याच असते.
              उदा.  १ + ९ + ३ = १३
                      ३ + ७ + ११ = २१
              १ + ५ + ११ + १३ + १९ =४९

(७) विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच
      येते.            उदा. ७ × ९ = ६३
                       ५ × ९ × ७ = ३१५

(८)सम संख्या आणि विषम संख्या यांची बेरीज
     विषम संख्या असते.
                 उदा.  १४ + २३ = ३७
                           ९ + १० = १९

(९) सम संख्या आणि विषम संख्या यांची
     वजाबाकी  विषम संख्या येते.
                  उदा. २८ - ११ = १७
                          ४३ - ३४ = ०९

(१०) सम संख्या आणि विषम संख्या यांचा
       गुणाकार सम संख्या येतो.
                 उदा.  १२ × ३ = ३६
                          १७ × ४ = ६८

  संकलक :- *शंकर  चौरे* (प्रा. शिक्षक)
                 जि.प.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

दशमान प्रणालीने संख्या लिहिणे.

आपल्याकडे फक्त दहा चिन्हे आहेत. त्यांचाच
पुन्हा पुन्हा वापर करून दशमान प्रणालीत संख्या
लिहितात. 0, 1 ,2, 3,4, 5,6,7,8, 9 ही मूलभूत
चिन्हे होय. ह्या चिन्हांची किंमत त्या चिन्हांच्या
स्थानावर व प्रणालीवर अवलंबून असते.
भारतात आपण भारतीय संख्या प्रणाली किंवा
आंतरराष्ट्रीय संख्या प्रणालीचा वापर करतो.

    ☆भारतीय प्रणाली -
● दहा एककाच्या गटास ' दहा ' म्हणतात.

● दहा दशकाच्या गटास  'शंभर ' म्हणतात.

● दहा शतकाच्या गटास ' हजार ' म्हणतात.

● दहा हजाराच्या गटास  ' दहा हजार 'म्हणतात.

● दहा दहाहजाराच्या गटास ' लाख ' म्हणतात.

● दहा लाखाच्या गटास  ' दशलक्ष ' म्हणतात.

● दहा दहा लाखाच्या गटास ' कोटी ' म्हणतात.

● दहा कोटीच्या गटास ' दशकोटी ' म्हणतात.

     अंकाची किंमत त्या अंकाच्या संख्येतील
स्थानावर अवलंबून असते.

    🔯 आंतरराष्ट्रीय प्रणाली :-

■ दहा एककाच्या गटास ' टेन ' म्हणतात.

■ दहा दशकाच्या गटास  ' हंड्रेड ' म्हणतात.

■ दहा शतकाच्या गटास ' थाऊजंड ' म्हणतात.

■ दहा हजाराच्या गटास 'टेन थाऊजंड 'म्हणतात.

■ दहा दहा हजाराच्या गटास 'हंड्रेड थाऊजंड '
    म्हणतात.

■ दहा शंभर हजाराच्या गटास ' मिलियन '
    म्हणतात.

■ दहा मिलियनच्या गटास ' टेन मिलियन '
    म्हणतात.

■ दहा दहा मिलियनच्या गटास ' हंन्ड्रेड
   मिलियन ' म्हणतात.

■ दहा शंभर मिलियन गटास 'बिलियन '
    म्हणतात.

 संख्येतील अंकाची किंमत अंकांची स्थानावर
   अवलंबून असते.

      संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                     जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                     ता.साक्री जि.धुळे
                      📞 ९४२२७३६७७५ 

आज फक्त शून्य

(१)कोणतीही संख्या आणि '०' (शून्य) यांचा
    गुणाकार ' ०' असतो.

(२) संख्येच्या एकक स्थानी  '०'(शून्य) असेल
   तर  २ ने नि:शेष भाग जातो.

(३) संख्येच्या एकक  '०'(शून्य) अंक असेल
     तर त्या संख्येस ५ नि:शेष भाग जातो.

(४) संख्येच्या एकक स्थानी ० (शून्य) हा अंक
     असेल, तर त्या संख्येस १० ने नि:शेष
      भाग जातो.

(५)एक पासून १०० पर्यंतच्या संख्येत '०'(शून्य)
    हा अंक एकूण ११ वेळा येतो.

(६) कोणत्याही संख्येला '०' ने (शून्याने) गुणले
     तर गुणाकार '० ' (शून्य) येतो.

(७) कोणत्याही संख्येने  '० 'ला (शून्याला) गुणले
     तर गुणाकार '०' (शून्य) येतो.

         संकलक : शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                       जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                       ता.साक्री जि.धुळे
                       📞 ९४२२७३६७७५
 

माझी उत्तरे

     
एके दिवशी मुलांनी विचारले :

● फुगा उंच आकाशात जातो तेव्हा काय होते?

---- फुग्याच्या आतमध्ये गॅस असतो. हा गॅस
हवेपेक्षा हलका असतो. म्हणून तो फुगा अधिक
उंच उंच जातो. काही वेळा तो फुटतो आणि
काही वेळा तो जमिनीवर पडतो.

● तो  ( फुगा ) का फुटतो ?

---- खूप उंचावर हवा अधिक अधिक विरळ
होत जाते. फुग्यातील गॅस रबरच्या पडद्यांना
धडका देतो. (बाहेरच्या) बाजूस ढकलतो. )
फुगा मोठा होत जातो. अखेरीस तो  फुटतो.

● तो  (फुगा ) जमिनीवर का पडतो ?

---- रबराच्या पडद्यांना अत्यंत सूक्ष्म धिद्रे
असतात. आपण ती पाहू शकत नाही. परंतु
फुग्यातील गॅस त्या छिद्रातून बाहेर पडतो.
तो फुगा अधिक अधिक लहान होत जातो.
जेव्हा अगदी थोडासाच गॅस फुग्यात उरतो
तेव्हा तो जमिनीवर पडतो.

          संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                        जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                        📞 ९४२२७३६७७५

गुरूमुळेच...! 

  

         गुरूमुळेच मी प्रेमळ झालो
         गुरूमुळेच मी निर्मळ झालो
         गुरूमुळेच मी जिद्दी झालो 
         गुरूमुळेच मी कष्टाळू झालो
         गुरूमुळेच मी धीट झालो
         गुरूमुळेच मी दयाळू झालो
         गुरूमुळेच मी संयमी झालो
         गुरूमुळेच मी हुशार झालो 
         गुरूमुळेच मी चलाख झालो
         गुरूमुळेच मी प्रामाणिक झालो
         गुरूमुळेच मी ज्ञानी झालो
         गुरूमुळेच मी नम्र झालो
         गुरूमुळेच मी आज्ञाधारक झालो
         गुरूमुळेच मी क्षमाशील झालो
         गुरूमुळेच मी विश्वासू झालो
         गुरूमुळेच मी विनयशील झालो
         गुरूमुळेच मी चित्रकार झालो
         गुरूमुळेच मी नृत्यकार झालो
         गुरूमुळेच मी संगीतकार झालो
         गुरूमुळेच मी सुसंस्कृत झालो
         गुरूमुळेच मी कवी झालो

                     लेखक --
                        शंकर चौरे
                        पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
                       📞९४२२७३६७७५
                           ७७२१९४१४९६           

रंजक  गणितीय माहिती


    
🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १
🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०
🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००
🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००
✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९
✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९
✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९
🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००
 🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००
🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००
🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १
🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १
✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १०
✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०
✴१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५
✴१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०
🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०
🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०
🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०
🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
     बेरीज -२५००
_____________________________________

कशापासून काय

(१) चपाती बनवतात   -- गहू

(२) गूळ बनवतात    --  ऊस

(३) कापड तयार करतात -- कापूस

(४) टेबलखुर्ची बनवतात  -- लाकूड /लोखंड.

(५) साखर बनवतात  -- ऊस

(६) मडके बनवतात  -- माती.

(७) भाकर बनवतात  -- बाजरी /ज्वारी.

(८) दही बनवतात   -- दूध.

(९) ताक बनवतात -- दही.

(१०) पापड बनवतात -- उडीद /नाचणी

(११) तेल काढतात -- शेंगदाणे /सोयाबीन

(१२) पोहे बनवतात -- तांदूळ.

(१३) हार बनवतात  -- फूले.

(१४) बासरी बनवतात -- बांबू.

(१५) दागिने बनवतात  -- सोने /चांदी.

(१६) रस बनवतात -- आंबा.

(१७)लोंच बनवतात -- कैरी /लिंबू

(१८) लोणी बनवतात -- दही.

(१९) तूप बनवतात  -- लोणी.

(२०) बिस्किट बनवतात -- गहू /नाचणी.

(२१) लाह्या बनवतात --  मका/ ज्वारी

(२२) आरसा बनवतात -- काच.

(२३) उसळ बनवतात -- मटकी /हरभरा /वाटाणा.

(२४) केस तेल बनवतात -- नारळ.

(२५) चुरमुरे बनवतात   -- तांदूळ.

(२६) वेफर बनवतात  -- बटाटे.

(२७) वरण बनवतात -- तूर.

(२८) भाजी बनवतात  -- वांगे / मेथी.

(२९) चटणी बनवतात -- मिरची.

(३०) विटा बनवतात -- माती.

        लेखन :- शंकर चौरे
                   जि.प.शाळा बांडीकुहेर
                   ताक साक्री जि.धुळे
                  📞९४२२७३६७७५

गणितीय माहिती शिकूया


                           
१) बेरीज - बेरीज म्हणजे दोन संख्याची मिळवनी.
               उदा.       ३+२ = ५

२) वजाबाकी - गटातून एखादी संख्या किंवा वस्तू काढून घेण्याच्या क्रियेस वजाबाकी म्हणतात.
                    उदा. ३-१म्हणजे ३ मधून १कमी
                           करणे.

३) गुणाकार - गुणाकार म्हणजे एकाच संख्येची    पुनः पुनः बेरीज करणे होय.  गुणाकार साठी                         ' × 'हे चिन्ह वापरतात.
                            
             उदा. ५+५      =    ५×२

४)भागाकार - क्रमवार वजाबाकी म्हणजे भागाकार होय.   भागाकार म्हणजे समान वाटप.
              उदा.   ८÷२ =

५) गुण्य - ज्या संख्येला गुणले जाते, त्या संख्येला गुण्य म्हणतात.

६) गुणक - ज्या संख्येने गुणले जाते, त्या संख्येला गुणक म्हणतात.

७) भाज्य - ज्या संख्येला भागले जाते त्या संख्येला भाज्य म्हणतात.

८) भाजक - ज्या संख्येने भागले जाते त्या संख्येला
भाजक म्हणतात

९) परीमिती - बंदिस्त झालेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परीमिती होय.         
                      
१०)क्षेत्रफळ  -आकृतीच्या क्षेत्राचे माप म्हणजे क्षेत्रफळ होय.
 
११) धारकता  - भांड्याची द्रव पदार्थ धारण करण्याची क्षमता म्हणजेच धारकता.
          
१२) किलोग्रॅम - वजन मोजण्याचे प्रमाणित एकक किलोग्रॅम आहे.

१३) लिटर - पातळ पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक लिटर आहे.

१६) मीटर - लांबी, उंची ,खोली मोजण्याचे
प्रमाणित एकक मीटर आहे.

 
       संकलक-
               शंकर चौरे. (प्रा.शि)
          जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर ता.साक्री(धुळे ) 
             📞 ९४२२७३६७७५
            
        एकच ध्यास, गुणवत्ता विकास  ! 

जंगली प्राण्यांची माहिती थोडक्यात


(१) वाघ --
 वाघ हा जंगली प्राणी आहे. वाघाला दोन
डोळे, चार पाय व दोन कान असतात.
त्याला लांब शेपूट असते. तो आकाराने
लांबट असतो. वाघाच्या पायांना धारदार
नखे असतात. वाघाचा  रंग पिवळा असतो
आणि त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात.
वाघ हा मांसाहारी प्राणी आहे.

(२) सिंह --
सिंह हा जंगली प्राणी आहे. सिंहाला दोन
डोळे,चार पाय व दोन कान असतात.
त्याला लांब शेपूट असते. तो आकाराने
लांबट असतो.सिंंहाच्या पायांना धारदार
नखे असतात. सिंहाचा रंग तपकिरी असतो.
सिंह हा मांसाहारी प्राणी आहे.

(३) हत्ती --
हत्ती हा जंगली प्राणी आहे. जंगली प्राण्यांमध्ये
सगळ्यात मोठा प्राणी आहे. हत्ती हा अतिशय
शांत प्राणी आहे. त्याला चार पाय,दोन डोळे,
दोन सुपासारखे मोठे कान आणि एक लांब
सोंड असते. सोंडेच्या दोन बाजूंना दोन मोठे
- लांब दात असतात. त्यांना सुळे म्हणतात.
हत्ती काहीसा लहरी असला तरी गरीब स्वभावाचा
असतो. तो शाकाहारी प्राणी आहे.

(४) हरीण -
हरीण हा अतिशय सुंदर असा प्राणी आहे.
हरीणाला चार पाय,दोन डोळे,दोन कान व
लहान शेपूट असते. हरीण हा अतिशय घाबरट
असा प्राणी आहे. त्याचा रंग(सोनेरी) केशरी
व त्यावर पांढरे ठिपके असतात.
हरीण हा शाकाहारी प्राणी आहे.

(५) कोल्हा -
कोल्हा हा कुत्र्याएवढा प्राणी आहे. त्याला
दोन डोळे,दोन कान, चार पाय व झुपकेदार
शेपूट असते. कोल्हा हा जंगलात कड्या
कपारीमध्ये राहतो. त्याचा रंग करडा असून
अंगावर लहान केस असतात. कोल्हा हा
मांसाहारी प्राणी आहे.

                   लेखन :--
                        शंकर चौरे
                        जि.प.शाळा- बांडीकुहेर
                        ता.साक्री जि. धुळे
                           ९४२२७३६७७५

मराठी,हिंदी,इंग्रजी शिकूया

मराठी-हिंदी-इंग्रजी शिकूया
 मराठी-हिंदी-इंग्रजी बोलूया ||धृ||
चंद्र मराठीत
चाॅद हिंदीत
इंग्रजीत म्हणतात मून  (MOON)

दुपार मराठीत
दोपहर हिंदीत
इंग्रजीम्हणतात नून     ( NOON)

सूर्य मराठीत
सूरज हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सन  ( SUN )

पळणे मराठीत
भागणे हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रन   (RUN)

माणूस मराठीत
आदमी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात मॅन ( MAN )

लेखणी मराठीत
कलम हिंदीत
इंग्रजीत म्हणतात पेन ( PEN)

कोंबडी मराठीत
मूर्गी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हेन  ( HEN )

पुस्तक मराठीत
किताब हिंदीत
इंग्रजीत म्हणतात बुक ( BOOK )

खिळा मराठीत
खिला हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हूक ( HOOK )

कोंबडा मराठीत
मुर्गा हिंदीत
इंग्रजीत म्हणतात काॅक ( COCK )

कुलूप मराठीत
ताला हिंदीत
इंग्रजीत म्हणतात लाॅक  ( LOCK )

बाहुली मराठीत
गुडीया हिंदीत
इंग्रजीत म्हणतात डाॅल   (DOLL)

चेंडू मराठीत
गेंद हिंदीत
इंग्रजीत म्हणतात बाॅल  ( BALL)

भिंत मराठीत
दिवार हिंदीत
इंग्रजीत म्हणतात वाॅल  ( WALL )

मांजर मराठीत
बिल्ली हिंदीत
 इंग्रजीत म्हणतात कॅट ( CAT)

उंदिर मराठीत
चुहा हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रॅट  ( RAT )

होडी मराठीत
नाव हिंदीत
इंग्रजीत म्हणतात बोट ( BAOT )

शेळी मराठीत
बकरी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात गोट  ( GAOT)

झोपडी मराठीत
कुटी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हट   ( HUT)

कापणे मराठीत
काटना हिंदीत
इंग्रजीत म्हणतात कट  (CUT)

मुलगा मराठीत
लडका हिंदीत
इंग्रजीत म्हणतात बाॅय  (BOY)

खेळणी मराठीत 
खिलोना हिंदीत
इंग्रजीत म्हणतात टाॅय   (TOY)
 
नाव मराठीत
नाम हिंदीत
इंग्रजीत म्हणतात नेम   ( NAME )

खेळ मराठीत
खेल हिंदीत
इंग्रजीत म्हणतात गेम   ( GAME )

समुद्र मराठीत
सागर हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सी     ( SEA)

चहा मराठीत
चाय हिंदीत
इंग्रजीत म्हणतात टी       ( TEA )

     लेखक ~
               शंकर चौरे. (प्रा.शि)
                ता. साक्री जि.धुळे       
                Mo. 9422736775          
                    7721941496