१) बेरीज - बेरीज म्हणजे दोन संख्याची मिळवनी.
उदा. ३+२ = ५
२) वजाबाकी - गटातून एखादी संख्या किंवा वस्तू काढून घेण्याच्या क्रियेस वजाबाकी म्हणतात.
उदा. ३-१म्हणजे ३ मधून १कमी
करणे.
३) गुणाकार - गुणाकार म्हणजे एकाच संख्येची पुनः पुनः बेरीज करणे होय. गुणाकार साठी ' × 'हे चिन्ह वापरतात.
उदा. ५+५ = ५×२
४)भागाकार - क्रमवार वजाबाकी म्हणजे भागाकार होय. भागाकार म्हणजे समान वाटप.
उदा. ८÷२ =
५) गुण्य - ज्या संख्येला गुणले जाते, त्या संख्येला गुण्य म्हणतात.
६) गुणक - ज्या संख्येने गुणले जाते, त्या संख्येला गुणक म्हणतात.
७) भाज्य - ज्या संख्येला भागले जाते त्या संख्येला भाज्य म्हणतात.
८) भाजक - ज्या संख्येने भागले जाते त्या संख्येला
भाजक म्हणतात
९) परीमिती - बंदिस्त झालेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परीमिती होय.
१०)क्षेत्रफळ -आकृतीच्या क्षेत्राचे माप म्हणजे क्षेत्रफळ होय.
११) धारकता - भांड्याची द्रव पदार्थ धारण करण्याची क्षमता म्हणजेच धारकता.
१२) किलोग्रॅम - वजन मोजण्याचे प्रमाणित एकक किलोग्रॅम आहे.
१३) लिटर - पातळ पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक लिटर आहे.
१६) मीटर - लांबी, उंची ,खोली मोजण्याचे
प्रमाणित एकक मीटर आहे.
संकलक-
शंकर चौरे. (प्रा.शि)
जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर ता.साक्री(धुळे )
📞 ९४२२७३६७७५
एकच ध्यास, गुणवत्ता विकास !
No comments:
Post a Comment