माझे सरकार आल्यावर असे होईल
रंक राजा होईल
गरीब श्रीमंत होईल
नोकर मालक होईल
निर्धन धनवान होईल
पण केव्हा माझे सरकार येईल तेव्हा
दुष्काळ सुकाळ होईल
आळशी उद्योगी होईल
दुर्बल बलवान होईल
महाग स्वस्त होईल
पण केव्हा माझे सरकार येईल तेव्हा
दुःखी आनंदी होईल
भित्रा धीट होईल
अबोल बोलका होईल
शत्रू मित्र होईल
पण केव्हा माझे सरकार येईल तेव्हा
परकीय स्वकीय एक होईल
वैयक्तिक ,सार्वजनिक काम होईल
बिनपगारी पगारी होईल
जमा खर्च नीट होईल
पण केव्हा माझे सरकार येईल तेव्हा
लेखक / कवी :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment