वर्षभरातल्या आकारीक चाचण्या
सांगत असतात मार्क खूप-खूप
प्रगतीपत्रकात कळत नसते
गुणांचे खरे रूप
कोणत्या विषयात किती मार्क
विद्यार्थी काढतात फक्त तर्क
चर्चा आणि गोंधळात पालकांची शर्थ
कधीच कळत नसते श्रेण्यांचा अर्थ
कुणाला 'अ' तर कुणाला 'ब' श्रेणी
तेच तेच श्रेणींचे शिक्के
कुणालाच कळत नाही गुणांचे टक्के
वार्षिक निकालात आकडेमोडीला भाव
श्रेणीरूपी प्रगती ,अक्षराचा डाव
यालाच म्हणतात प्रगतीचे नाव
लेखक :-
शंकर चौरे. (प्रा.शि)
पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे
📞 Mo. ९४२२७३६७७५
७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment