मराठी भाषेत अनेक वाक्प्रचारयुक्त तुलना
आहेत. उदा. कोळशासारखा काळा.या तुलना बोलताना किंवा लिहिताना योग्य रीतीने वापरल्या गेल्या,तर भाषेची संपन्नता व्यक्त होते आणि तुलनाही ठाशीक स्वरूपात केली जाते.
खाली या प्रकारच्या अनेक वाक्प्रचारयुक्त
तुलना दिल्या आहेत.
(१) सोन्यासारखा पिवळा.
(२) कोळशासारखा काळा.
(३) सिंहासारखा शूर.
(४) काचेसारखा ठिसूळ.
(५) मधमाशीसारखा उद्योगी.
(६) बर्फासारखा थंड.
(७) कोल्ह्यासारखा धूर्त.
(८) सशासारखा चपळ.
(९) वाघासारखा हिंस्र.
(१०) खडकासारखा खंबीर (स्थिर).
(११) हवेसारखा निरंकुश (मुक्त).
(१२) कोकरासारखा गरीब.
(१३) सोन्यासारखा अस्सल.
(१४) हंसासारखा डौलदार.
(१५) न्यायाधीशासारखा गंभीर.
(१६) गवतासारखा हिरवागार.
(१७) गारगोटीसारखा टणक.
(१८) राजाइतका सुखी.
(१९) शिसासारखा जड.
(२०) अग्नीसारखा उष्ण.
(२१) कबुतरासारखा निष्पाप.
(२२) पिसासारखा हलका.
(२३)मेघगर्जनेसारखा मोठा(आवाज).
(२४) माशासारखा मूक.
(२५) खारीसारखा चपळ.
(२६) मोरासारखा गर्विष्ठ.
(२७) विजेसारखा गतिमान(चपळ).
(२८) रक्तासारख लाल.
(२९) चेंडूसारखा गोल.
(३०) घड्याळासारखा नियमित.
(३१) वस्त-यासारखा धारदार.
(३२) लोण्याइतके मऊ.
(३३) मेणासारखे मऊ.
(३४) गोगलगायीसारखा मंदगतीचा.
(३५) मधासारखे गोड.
(३६) बाणासारखे वेगवान.
(३७) कोंबडीच्या पिलासारखा गरीब.
(३८) सशासारखा भित्रा.
(३९) माकडासारखा चलाख.
(४०) केसासारखा बारीक.
(४१) लोकरीसारखा उबदार
(४२) चंडोल पक्ष्यासारखा आनंदी.
(४३) विहिरीसारखा खोल.
(४४) पुतळ्यासारखा स्तब्ध (मुका)
(४५) चेरीसारखा लाल.
(४६) सुईसारखा तीक्ष्ण.
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment