(१) गाय -
गाय पाळीव प्राणी आहे. गाईचा रंग
पांढरा,तांबूस किंवा काळा असतो.
तिला दोन शिंगे असतात. तिचे शेपूट
गोंडेदार असते. गाईचे डोळे काळेभोर
व टपोरे असतात. गाय हा खूप उपयुक्त
प्राणी आहे. गाईपासून आपल्याला दूध
मिळते.
(२) बैल -
बैल हा पाळीव प्राणी आहे. त्याचे डोळे
टपोरे असतात. त्याला दोन शिंगे व
गोंडेदार शेपूट असते. तो काळ्या,पांढर्या
किंवा तांबूस रंगाचा असतो. तो खूप
ताकदवान असतो. नांगराला बैल जोडतात.
बैल नांगर ओढत असतो.
(३) घोडा -
घोडा हा पाळीव प्राणी आहे. तो देखणा,
रुबाबदार व मजबूत असतो. घोडा हा
काळ्या, पांढर्या किंवा तांबूस रंगाचा
असतो. त्याच्या पायांना खूर असतात.
त्यांना पोलादी नाल ठोकलेली असते.
घोडा खूप जलद पळतो.
(४) मांजर
मांजर हा पाळीव प्राणी आहे.त्याच्या
अंगावर मऊ केस असतात. त्याचे डोळे
घारे असतात. मांजराला मिशाही असतात.
मांजर पांढर्या, काळ्या, सोनेरी किंवा
करड्या रंगाचे असते. ते म्याव् म्याव्
ओरडते.
(५) उंट
उंट हा पाळीव प्राणी आहे. उंटाचे पाय
खूप उंच असतात. त्याची मान लांब
असते. पण तोंड आणि कान अगदी
लहान असल्यामुळे उंट फार विचित्र
व कुरूप दिसतो. त्यांच्या पाठीवर उंचवटा
असतो. त्याला मदार म्हणतात. त्याचा
रंग मळकट असतो. वाळवंटातील लोकांना
उंटाचा फार उपयोग होतो.
लेखन :--
शंकर चौरे
जि.प.प्रा शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
श्री.वाकचौरे सरजी आपण खुपच छान माहीती पाठवतात...Nice Excellent ..
ReplyDelete