आपल्याकडे फक्त दहा चिन्हे आहेत. त्यांचाच
पुन्हा पुन्हा वापर करून दशमान प्रणालीत संख्या
लिहितात. 0, 1 ,2, 3,4, 5,6,7,8, 9 ही मूलभूत
चिन्हे होय. ह्या चिन्हांची किंमत त्या चिन्हांच्या
स्थानावर व प्रणालीवर अवलंबून असते.
भारतात आपण भारतीय संख्या प्रणाली किंवा
आंतरराष्ट्रीय संख्या प्रणालीचा वापर करतो.
☆भारतीय प्रणाली -
● दहा एककाच्या गटास ' दहा ' म्हणतात.
● दहा दशकाच्या गटास 'शंभर ' म्हणतात.
● दहा शतकाच्या गटास ' हजार ' म्हणतात.
● दहा हजाराच्या गटास ' दहा हजार 'म्हणतात.
● दहा दहाहजाराच्या गटास ' लाख ' म्हणतात.
● दहा लाखाच्या गटास ' दशलक्ष ' म्हणतात.
● दहा दहा लाखाच्या गटास ' कोटी ' म्हणतात.
● दहा कोटीच्या गटास ' दशकोटी ' म्हणतात.
अंकाची किंमत त्या अंकाच्या संख्येतील
स्थानावर अवलंबून असते.
🔯 आंतरराष्ट्रीय प्रणाली :-
■ दहा एककाच्या गटास ' टेन ' म्हणतात.
■ दहा दशकाच्या गटास ' हंड्रेड ' म्हणतात.
■ दहा शतकाच्या गटास ' थाऊजंड ' म्हणतात.
■ दहा हजाराच्या गटास 'टेन थाऊजंड 'म्हणतात.
■ दहा दहा हजाराच्या गटास 'हंड्रेड थाऊजंड '
म्हणतात.
■ दहा शंभर हजाराच्या गटास ' मिलियन '
म्हणतात.
■ दहा मिलियनच्या गटास ' टेन मिलियन '
म्हणतात.
■ दहा दहा मिलियनच्या गटास ' हंन्ड्रेड
मिलियन ' म्हणतात.
■ दहा शंभर मिलियन गटास 'बिलियन '
म्हणतात.
संख्येतील अंकाची किंमत अंकांची स्थानावर
अवलंबून असते.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment