(१)नाम :- प्रत्यक्ष दिसणार्या किंवा कल्पनेने
जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा
तिच्या गुणधर्माला जे नाव दिले जाते
त्याला 'नाम ' असे म्हणतात.
उदा. मुलगा, सुप्रिया, कावळा, वाघ,चाफा,
भेंडी, फळा, लाडू, तापी, सातपुडा,
कान, भाऊ, देवदूत, नम्रता, दुःख, इ.
--------------------------------------------------
(२)सर्वनाम :-नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या
शब्दाला सर्वनाम म्हणतात.
उदा. मी, आम्ही, तू , तुम्ही, तो, ती, ते,
हा, ही, हे, जो, जे, कोण, काय,
आपण, स्वत: , इत्यादी.
--------------------------------------------------
(३) विशेषण :- नामाबद्दल विशेष माहिती
सांगणार्या शब्दाला विशेषण म्हणतात.
उदा. गोड, कडू, लहान, मोठा, हुशार,
उत्तम, चांगला, बलाढ्य, दोन,शूर
सुंदर, पुष्पळ,इत्यादी.
--------------------------------------------------
(४) क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या
क्रियावाचक शब्दाला क्रियापद
म्हणतात.
उदा. खातो, पितो, करतो, येतो, आहे,
बघतो, जाईल, गातो, इत्यादी.
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment