(१) मोर -
मोर हा फारच सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग
चमकदार हिरवा -निळा असतो. त्याच्या
डोक्यावर सुंदर तुरा असतो. पण त्याचे
पाय कुरूप व उंच असतात. मोराचा
पिसारा वजनदार व लांबलचक असतो.
मोर पावसात पिसारा फुलवतो आणि
नाचतो. तेव्हा तो फारच सुंदर दिसतो.
मोर रानात राहतो. तो धान्य व कीटक
खातो. तो फार उंच उडू शकत नाही.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
----------------------------------------
*(२) पोपट -*
पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग
हिरवागार असतो. त्याची चोच लालभडक,
बाकदार व धारदार असते. त्याच्या गळ्या-
भोवती काळी रेघ असते.त्याला कंठ
म्हणतात. पोपट झाडाच्या ढोलीत राहतो.
-----------shankar chaure ------
*(३) कावळा -*
कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे.
त्याचा रंग काळाकुट्ट असतो. मानेजवळचा
भाग मात्र करडा असतो. त्याची चोच
खूप मोठी असते. त्याचा आवाज कर्कश
असतो. तो कावकाव ओरडतो. तो खूपच
चलाख असतो. कावळा उंचावर घरटे
बांधतो. तो अळ्या,किडे आणि जे इतर
काही मिळेल ते खातो. लहान मुलांना
हा पक्षी फारच आवडतो.
--------------------------------------------
(४) कोंबडा -
कोंबडा हा पाळीव पक्षी आहे. तो फार
उंच उडू शकत नाही. मुख्यतः तो चालतोच
त्याचे चालणे ऐटबाज असते. कोंबडे
पांढर्या, काळ्या किंवा तपकिरी व मिश्र
रंगाचे असतात.कोंबड्याची चोच टोकदार
असते. पाय उंच असतात. त्याच्या डोक्यावर
लालभडक तुरा असतो. तो दिवसभर
इकडेतिकडे फिरत असतो. मातीतील
धान्याचे कण व किडे हे त्याचे अन्न असते.
कोंबड्याच्या ओरडण्याला आरवणे
म्हणतात.
---------------------------------------------
(५) चिमणी -
चिमणी हा पक्षी सर्वत्र आढळतो. चिमणी
हा अगदी छोटासा पक्षी आहे. चिमणीचा
रंग करडा असतो. इवल्याशा चोचीने ती
पटपट दाणे टिपते. तिचे पंख इवलेसे व
पायही इवलेसे असतात. ती एक-एक पाय
टाकत कधी चालत नाही. ती टुणटुण उड्या
मारत चालते. चिमणी चिवचिव आवाज
काढून इकडेतिकडे भुर्रकन उडत फिरते.
लहान मुलांना चिमणी फार आवडते.
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment