माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 25 January 2018

आमच्या शाळेत हे चालणार नाही.

(१)आमच्या शाळेच्या भिंती रंगरंगोटी केलेल्या
    आणि सुंदर बनलेल्या नसतील तरी चालेल,
    परंतु जर त्यांच्यावर एकजरी जाळी किंवा
   धूळ चिकटून बसलेली असेल,तर ते चालणार
   नाही.

(२)आमच्या शाळेत चांगल्या सतरंज्या
अंथरलेल्या नसल्या तरीही चालेल. परंतु जर
कोठेही थोडासा कचरा किंवा धूळ पडलेली
असेल आणि ती पायांना लागत असेल, तर
ते चालणार नाही.

(३)आमच्या शाळेत शिक्षणाची बरीचशी
उपककरणे नसली तरी चालतील. पण जर
अगदी थोडीच उपकरणे असतील आणि
ती अजिबात वापरात आणली जात नसतील
तर ते चालणार नाही.

(४)आमच्या शाळेत मुले दोन क्षण अभ्यास
करतील आणि दोन क्षण खेळतील तर चालेल.
परंतु जर मुले कारखान्यातील मजुरांप्रमाणे
दिवसभर काम करतच राहतील. आणि आम्ही
लोक त्यांच्यावर कडक नजर ठेवून असू तर
ते चालणार नाही.

(५)आमच्या शाळेतील मुले कमी शिकली तरी
चालेल, हळूहळू शिकली तरी चालेल पण जर
ते ओरडून ओरडून वाचता -वाचता कंटाळत
असतील आणि ढिली पडत असतील,तर ते
चालणार नाही.

(६)आमच्या शाळेत मुलांना एखादे काम
समजले नाही आणि त्यांनी आम्हाला धैर्यांने
सांगितले किंवा नंतर हळूहळू ते काम केले
तरी ते चालेल. जर धाकदपटशा आणि
मारहाणीने ते लवकरात लवकर करत असतील,
तर ते चालणार नाही. 

  
 संकलक :-  शंकर सिताराम  चौरे(प्रा. शिक्षक)
                          जि.प.शाळा बांडीकुहेर
                          ता.साक्री जि.धुळे
                            ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment