व्यावसायिकांची थोडक्यात माहिती
(१) कुंभार :-
कुंभ म्हणजे घडा. म्हणून कुंभ बनविणाऱ्याला
कुंभार म्हणतात. कुंभार फक्त घडेच बनवितो
असे नाही. तो घरबांधणीसाठी लागणार्या
विटा, झाडांसाठी कुंड्या,मातीची खेळणी,
मूर्ती व विविध प्रकारची नक्षीची भांडीही
बनिवतो. कुंभाराचे काम खूप कष्टाचे व
कौशल्याचे असते. फिरत्या चाकावर पटपट
आकार घेणारे भांडे पाहताना बघणाऱ्याला
खूप नवल वाटते.
-----------------------------------------------
(२) सुतार :-
लाकूडकाम करणाऱ्याला सुतार म्हणतात.
सुतारकाम शिकून घ्यावे लागते. जी वस्तू
बनवायची तिच्या मोजमापाची व आकार -
मानाची नेमकी कल्पना सुताराला असावी
लागते. सुतार लाकडापासून विविध वस्तू
बनवितो. आपल्या घरातील टेबले,खुर्च्या,
लाकडी कपाटे,दिवाण या सर्व वस्तू सुतारानेच
केलेल्या असतात. मोजपट्टी,रंधा, हातोडी,
ड्रील मशीन, करवत, खिळे व पेन्सिल ही
सुतारकामाची काही साधने आहेत. सुतारकाम
ही एक कला आहे.
-----------------------------------------------
(३)लोहार :-
लोखंडाच्या व पोलादाच्या वस्तू बनविणाऱ्या
कारागिराला लोहार म्हणतात. लोहाराला
त्याच्या कामासाठी लोखंड,घण,ऐरण या वस्तू
लागतात. लोहाराच्या दुकानात मातीत खड्डा
खणून तयार केलेली एक शेगडी असते. तिला
भट्टी म्हणतात. भट्टीला भाता जोडलेला असतो.
लोखंड टणक असते.भट्टीमध्ये लोखंड तापवले
की ते लवचिक होते. मग ते ऐरणीवर ठोकून
लोहार त्यापासून हव्या त्या आकाराच्या वस्तू
बनवतो. कुऱ्हाड,फावडे, चाकू, कात्र्या, सु-या,
हत्यारे, विळीची पाती, तवा, पळ्या, गाडीच्या
धावा अशा कितीतरी वस्तू लोहार बनवितो.
-----------------------------------------------
(४) सोनार :-
सोनार सोन्याचांदीचे दागिने बनवतो. त्याच्या
कामासाठी शेगडी, छोटी फुंकणी, मूस, छोटी
ऐरण,छोटा तराजू व वजन-मापे इत्यादी साधने
लागतात. सोनार प्रथम सोन्याचे वजन करतो.
गिऱ्हाईकाला दागिन्यांचे नमुने दाखवून त्याची
पसंती विचारतो व त्याप्रमाणे दागिने करायला
घेतो. सोनाराच्या कामात फार कुशलता असावी
लागते.
-----------------------------------------------
(५) शिंपी :-
कपडे शिवून देणार्या माणसाला शिंपी
म्हणतात. स्त्री, पुरुष दोघेही शिंपीकाम करू
शकतात. कापड, शिवण्याचे मशीन, सुई,
दोरा, टेप व कात्री ही शिंप्याला लागणारी
साधने असतात. शिंपी टेपने गिऱ्हाईकाच्या
शरीराचे माप घेतो व मग त्यानुसार कापड
बेतून घेतो. मग बेतलेले कापड मशीनवर
शिवतो.अंगाबरोबर कपडा शिवणे ही एक
कला आहे.
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शि.)
जि.प.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment