उपक्रम
🔹 ओळखा पाहू मी कोण ? 🔹
● उद्देश :- विचारशक्तीस चालना मिळणे.
■ सूचना :- दिलेल्या कोड्याची उत्तरे शोधा.
प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि
सोडवायला वेळ एक मिनिट. पाच मिनिटात
पाच कोडे सोडविणारा विजयी ! पाहू कोण
सोडवितो सर्व कोडे(उखाणे) ?
(१) पंख नाही पण उडे आकाशी
शेपूट हलवतो पण नाही प्राणी-मी कोण?
(२) हवेत सोडीत काळ्या रेघा
गावोगावी जाते राणी
लोखंडाचा रस्ता हिचा
सांगा हिला ओळखेल कोण ?
(३) झाडावर राहतो पण पक्षी नव्हे,
तीन डोळे पण शंकर नव्हे,
वल्कलेधारी पण ऋषिमुनी नव्हे,
पोटात पाणी पण घट नव्हे.
(४) पाण्यामध्ये पोहू शकतो,
जमिनीवर उड्या मारतो,
कीटक,गांडूळ याचे भक्ष्य,
चिकट जीभेने करतो फस्त
असा कोण सांगा सांगा !
(५) ध्यान लावून बसतो मी
तासन् तास तळ्याकाठी
एका पायावर उभा राहतो
भक्ष्य दिसताच मटकावतो !
(६) वरून लोंबतात मुळे माझी,
गर्द सावली थंडगार,
सावलीत माझ्या विसावतात
सारे लहानथोर.
उत्तरे :-(१) पतंग, (२)आगगाडी,(३)नारळ,
(४)बेडूक, (५) बगळा.(६) वड
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
सांगा उत्तर
ReplyDeleteक्लास मधे एक नवीन मुलगा आला. सगळ्यांनी त्याला त्याचं नाव विचारलं , पण त्यानी कोणालाच त्याचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर तो फक्त एक तारीख लिहून गेला .
13 / 01 / 2000
काय असेल बर त्याचं नाव ..?