माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 25 August 2017

भूरूपे/भूरूपांची थोडक्यात माहिती


      विषय :- परिसर अभ्यास(भूगोल)

    भूरूपे/भूरूपांची थोडक्यात माहिती

(१) मैदान म्हणजे काय  ?
-- नैसर्गिक सपाट जमिनीस मैदान म्हणतात.

(२) टेकडी म्हणजे काय  ?
--- जमिनीवरील उंचवट्याचा भाग म्हणजे
    टेकडी होय.

(३) पठार म्हणजे काय  ?
--- उंचीवरील सपाट प्रदेश म्हणजे पठार होय.

(४) डोंगर म्हणजे काय  ?
--- उंच टेकडीला डोंगर म्हणतात.

(५) दरी म्हणजे काय  ?
--- डोंगरावरील खूप खोल व लांबट भागास
    दरी म्हणतात.

(६) खिंड म्हणजे काय  ?
--- दोन डोंगरांतील अथवा पर्वतांतील खोलगट
    अरुंद भागास खिंड म्हणतात.

(७) घाट म्हणजे काय  ?
--- डोंगराळ अथवा पर्वताच्या भागात
    वळणावळणाचा जो रस्ता असतो,
    त्यास घाट म्हणतात.

(८) पर्वत म्हणजे काय  ?
--- उंच डोंगराला पर्वत म्हणतात.

(९) शिखर म्हणजे काय  ?
--- पर्वताचे निमुळते टोक म्हणजे शिखर
    होय.

      संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                     जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                     ता. साक्री जि. धुळे
                    📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment