चला जाऊया पर्यटनाला
(महाराष्ट्र दर्शनाला जाऊया)
१.मुंबई शहरात- गेट वे आॅफ इंडिया पाहू.
२.मुंबई उपनगरात - राष्ट्रीय उद्यान पाहू .
३.ठाणे जिल्ह्यात -वज्रेश्वरीचे गरम पाण्याचे झरे
पाहू.
४.पालघर जिल्ह्यात -समुद्र किनारा पाहू.
५.रायगड जिल्ह्यात - रायगड किल्ला पाहू
६.रत्नागिरी जिल्ह्यात - हापूस आंब्यांच्या बागा
पाहू.
७. सिंधुदुर्ग जिल्ह्यात - सुपारीच्या बागा पाहू
८.नाशिक जिल्ह्यात - मांगीतुंगी पाहू.
९.धुळे जिल्ह्यात- प्राचीन वस्तू संग्रहालय पाहू.
१०.नंदुरबार जिल्ह्य़ात - तोरणमाळ पाहू
११.जळगाव जिल्ह्य़ात -केळीच्या बागा पाहू.
१२.अहमदनगर जिल्ह्यात - कळसूबाई शिखर
पाहू.
१३. पुणे जिल्ह्यात - शनिवारवाडा पाहू.
१४. सातारा जिल्ह्यात - महाबळेश्वर पाहू.
१५.सांगली जिल्ह्यात- हळदीची बाजारपेठ पाहू.
१६.सोलापूर जिल्ह्यात - चांदरींची बाजारपेठ पाहू
१७. कोल्हापूर जिल्ह्यात - पन्हाळा किल्ला पाहू.
१८. औरंगाबाद जिल्ह्य़ात - अजिंठा-वेरूळच्या
लेण्या पाहू.
१९.जालना जिल्ह्य़ात -जाफराबादचा पुरातन
भुईकोट किल्ला पाहू.
२०. परभणी जिल्ह्य़ात - 'प्रभावती' देवीचे
प्राचीन मंदिर पाहू.
२१. हिंगोली जिल्ह्यात-औंढाचे ज्योतिर्लिंग पाहू.
२२. बीड जिल्ह्य़ात-परळीचे ज्योतिर्लिंग पाहू.
२३. नांदेड जिल्ह्य़ात - गुरुद्वारा पाहू.
२४.उस्मानाबाद जिल्ह्य़ात - तुळजाभवानी पाहू.
२५.लातूर जिल्ह्य़ात- केशवराज मंदिर पाहू.
२६. बुलढाणा जिल्ह्य़ात- लोणार सरोवर पाहू.
२७.अकोला जिल्ह्य़ात -औष्णिक विद्युतकेंद्र पाहू
२८. वाशिम जिल्ह्य़ात- बालाजी मंदिर पाहू.
२९. अमरावती जिल्ह्य़ात- गाडगेबाबाची
समाधी स्थान पाहू.
३०. यवतमाळ जिल्ह्य़ात -कळंब येथील
प्राचीन शिलालेख पाहू.
३१. वर्धा जिल्ह्य़ात -महात्मा गांधीचे
सेवाग्राम आश्रम पाहू.
३२ नागपूर जिल्ह्य़ात - 'संत्री' बागा पाहू
३३. भंडारा जिल्ह्य़ात- तुमसरचा कागद
कारखाना पाहू.
३४. गोदिंया जिल्ह्य़ात - विविध तलाव पाहू.
३५. चंद्रपूर जिल्ह्य़ात- गोंड राजाचा किल्ला
व आनंद वन पाहू.
३६.गडचिरोली जिल्ह्य़ात -घनदाट जंगल पाहू
लेखन :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment