☆अंतर - (१)मन
(२)लांबी
☆अंक -(१) मांडी
(२) आकडा (संख्या )
☆अंग -(१) शरीर
(२) बाजू
☆कर -(१)हात
(२) सरकारी सारा
☆ दंड -(१)शिक्षा
(२)बाहू
☆नाद -(१)छंद
(२) आवाज
☆नाव -(१)होडी
(२)कशाचेही नाव
☆ गार - (१)थंड
(२) बर्फाची गोटी
☆ चूक - (१)दोष
(२) लहान खिळा
☆ जात - (१)प्रकार
(२)समाज
☆जोडा - (१)जोडपे
(२) बूट
☆धडा - (१)पाठ
(२) रिवाज
☆ धनी - (१)मालक
(२) श्रीमंत मनुष्य
☆पत्र -(१) पान
(२) चिठ्ठी
☆पास -(१)उत्तीर्ण
(२)परवाना
☆ बाल -(१) बालक
(२)केस
☆फळ - (१)यश
(२)झाडाचे फळ
☆रस -(१)द्रवपदार्थ
(२) गोडी
☆रक्षा -(१) राख
(२) रक्षण
☆ वचन -(१)भाषण
(२)प्रतिज्ञा
☆वजन -(१)भार
(२)मान
☆वळण - (१) वाकडा रस्ता
(२) प्रवृत्ती
☆वार -(१)घाव
(२) दिवस
☆सुमन - (१)फूल
(२) चांगले मन
☆हवा -(१) वायू
(२)पाहिजे असा
☆कलम -(१) लेखणी
(२) रोपांचे कलम
☆घट -(१)मडके
(२)झीज
☆चक्र - (१)चाक
(२) एक शस्त्र
☆चिमणी -(१)एक पक्षी
(२)गिरणीचे धुराडे
☆ तट -(१)किनारा
(२) किल्ल्याची भिंत
☆ताव -(१)तापविणे
(२) कागद
☆नग -(१)पर्वत
(२)वस्तू
☆वात -(१)वारा
(२) दिव्याची वात
☆हार -(१)पराभव
(२)फुलांचा हार
संकलक~ शंकर सितारामचौरे (प्रा.शि )
जि.प.शाळा बांडीकुहेर ता. साक्री (धुळे)
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment