जंगली प्राण्यांची थोडक्यात माहिती
(१) वाघ --
वाघ हा जंगली प्राणी आहे. वाघाला दोन
डोळे, चार पाय व दोन कान असतात.
त्याला लांब शेपूट असते. तो आकाराने
लांबट असतो. वाघाच्या पायांना धारदार
नखे असतात. वाघाचा रंग पिवळा असतो
आणि त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात.
वाघ हा मांसाहारी प्राणी आहे.
------------------------------------------
(२) सिंह --
सिंह हा जंगली प्राणी आहे. सिंहाला दोन
डोळे,चार पाय व दोन कान असतात.
त्याला लांब शेपूट असते. तो आकाराने
लांबट असतो.सिंंहाच्या पायांना धारदार
नखे असतात. सिंहाचा रंग तपकिरी असतो.
सिंह हा मांसाहारी प्राणी आहे.
---------------------------------------------
(३) हत्ती --
हत्ती हा जंगली प्राणी आहे. जंगली प्राण्यांमध्ये
सगळ्यात मोठा प्राणी आहे. हत्ती हा अतिशय
शांत प्राणी आहे. त्याला चार पाय,दोन डोळे,
दोन सुपासारखे मोठे कान आणि एक लांब
सोंड असते. सोंडेच्या दोन बाजूंना दोन मोठे
- लांब दात असतात. त्यांना सुळे म्हणतात.
हत्ती काहीसा लहरी असला तरी गरीब स्वभावाचा असतो. तो शाकाहारी प्राणी आहे.
--------------------------------------------------
http://shankarchaure.blogspot.in
--------------------------------------------------
(४) हरीण -
हरीण हा अतिशय सुंदर असा प्राणी आहे.
हरीणाला चार पाय,दोन डोळे,दोन कान व
लहान शेपूट असते. हरीण हा अतिशय घाबरट
असा प्राणी आहे. त्याचा रंग(सोनेरी) केशरी
व त्यावर पांढरे ठिपके असतात.
हरीण हा शाकाहारी प्राणी आहे.
-----------------------------------------------
(५) कोल्हा -
कोल्हा हा कुत्र्याएवढा प्राणी आहे. त्याला
दोन डोळे,दोन कान, चार पाय व झुपकेदार
शेपूट असते. कोल्हा हा जंगलात कड्या
कपारीमध्ये राहतो. त्याचा रंग करडा असून
अंगावर लहान केस असतात. कोल्हा हा
मांसाहारी प्राणी आहे.
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.शाळा- बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Nice
ReplyDeleteचौरे सर, तुम्ही share केलेल्या प्राण्यांची व पक्ष्यांची माहिती खूप छान व उपयुक्त आहे. तसेच साध्या व सोप्या भाषेत आहे. त्याचा उपयोग मी माझ्या पहिली व दुसरीच्या मुलांसाठी केला आहे.....मुलांकडून खूप छान👌 प्रतिसाद मिळाला आहे.... धन्यवाद सर.....असेच इंग्रजी मध्ये असतील तर share करा....
ReplyDeleteNice
ReplyDeletenice
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती.....!!👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteI'm jay pramod Bharat thanku
ReplyDeleteVery nice
ReplyDelete