भाषिक खेळ - वाक्य खंड
विविध खेळातून मुलांमध्ये भाषिक कौशल्य
विकसित करता येतात.पुढील प्रमाणे खेळ
वर्गात घेता येईल.
कृती :-
-- शब्द संपत्ती आणि स्मरण शक्तीसाठी हा
खेळ उपयुक्त आहे. वर्गातील मुले गोलाकार
बसतात. एक मुलगा सांगतो.
" मी खरेदीसाठी गेलो होतो. मी पाव आणला."
दुसरा मुलगा म्हणतो, " मी खरेदीसाठी गेलो
होतो. मी पाव आणला आणि साखर आणली."
तिसरा मुलगा म्हणतो, "मी खरेदीसाठी गेलो.
मी पाव आणला. साखर आणली व काड्याची
पेटी आणली."
चौथा मुलगा - म्हणतो, " -------------------"
एका वेळेस कमीत कमी दहा विद्यार्थी हा
खेळ खेळू शकतात. बाकीची मुले काळजी-
पूर्वक श्रवण करतात. आळीपाळीने वर्गातील
सर्व मुले ह्या खेळात सहभागी होतात.
* पुढे आणखी काही वाक्य खंड
दिले आहेत ते पहा.
(१)मी आज नदीवर गेलो.
एक खेकडा पाहिला. "
(२) माझे काका शहरातून आले,
त्यांनी मला टी शर्ट आणला."
(३) दुपारी मला खूप भूक लागली,
मी केळी खाल्ली."
(४)"आज शाळेत शिक्षकाने माशाबद्दल
माहिती दिली."
(५)"मी बागेत हिरवळीवर फिरायला गेलो.
एक पोपट पाहिला. "
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment