आई असे का .........?
सूर्याला कुणी म्हणतात भास्कर
कुणी म्हणतात दिनकर
समुद्राला कुणी म्हणतात सागर
कुणी म्हणतात रत्नाकर
देवाला कुणी म्हणतात परमेश्वर
कुणी म्हणतात ईश्वर
महादेवाला कुणी म्हणतात शंकर
कुणी म्हणतात महेशवर
गणपतीला कुणी म्हणतात गजानन
कुणी म्हणतात गौरीनंदन
घराला कुणी म्हणतात सदन
कुणी म्हणतात भवन
डोळ्याला कुणी म्हणतात नयन
कुणी म्हणतात लोचन
अरण्याला कुणी म्हणतात रान
कुणी म्हणतात वन
धरतीला कुणी म्हणतात धरणी
कुणी म्हणतात अवनी
रात्रीला कुणी म्हणतात रजनी
कुणी म्हणतात यामिनी
चंद्राला कुणी म्हणतात रजनीनाथ
कुणी म्हणतात निशिनाथ
राजाला कुणी म्हणतात भूपती
कुणी म्हणतात महीपती
मातोश्रीला कुणी म्हणतात आई
कुणी म्हणतात माई
वडीलांना कुणी म्हणतात पिता
कुणी म्हणतात जन्मदाता
मुलीला कुणी म्हणतात कन्या
कुणी म्हणतात तनया
श्रीला कुणी म्हणतात महिला
कुणी म्हणतात अबला
पाण्याला कुणी म्हणतात जल
कुणी म्हणतात सलिल
लेखक /कवि :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment