विषय - मराठी (भाषा )
🖋 शुद्धलेखन नियमावली✒
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
🔹मराठी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम-
(१) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार -
उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा.
उदा. मराठी, भाजी, पापडी, आणली,
आजी, वही, माती, आमची, चिमणी, सकाळी,
पक्षी, लागली, होती, झाली, छत्री, पणती,
मधू, , चेंडू, कडू, काकू, धावपटू ,बाळू इ.
अपवाद :- तथापि, परंतु ,आणि (संस्कृत शब्द)
============================
(२) एकाक्षरी शब्दातील इकार -उकार दीर्घ
लिहावा.
उदा. मी, ही, ती , जी , की, बी, पी , फी,
तू , धू , पू, भू , ऊ .
अपवाद :- ' नि ' हे उभान्वयी अव्यव र्हस्व
लिहावे.
=============================
(३) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे
होतो. त्या अक्षरावर अनुस्वार किंवा
शीर्षबिंदू द्यावा.
उदा. घंटा , तंटा, चिंच, आंबा, कोंबडा,
कुंकू, गंगा, निबंध, अभिनंदन.
=============================
(४) ' पूर ' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही
गावाच्या नावाला लावताना खालीलप्रमाणे
लिहिवा.
उदा. नागपूर, सोलापूर , तारापूर , गोरखपूर.
============================
(५) एकच शब्द वा अक्षर पुन:पुन्हा येऊन,
म्हणजे पुनरक्त होऊन तयार होणारे शब्द
खालीलप्रमाणे लिहिले जातात.
उदा. हळूहळू , मुळूमुळू , लुटूलुटू ,
दूर दूर ,बारीकसारीक .
●अशाच प्रकारचे शब्द एखाद्या ध्वनीचे
अनुकरण करणारे नादानुकारी असतील,
तर ते खालीलप्रमाणे लिहिले जातात.
उदा. रुणुझुणु , तुरुतुरु , लुटुलुटु ,
झुळुझुळु , दुडुदुडु.
============================
(६) मराठी शब्दांतील अनुस्वार ,विसर्ग किंवा
जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार - उकार
र्हस्व लिहिले जातात.
उदा. भिंत , किंचित, हिंमत, चिंता , मुंगी ,
चिंध्या, जिवंत , चिंच , अभिनंदन , किंवा .
● जोडाक्षरपूर्वीचे अक्षर र्हस्व लिहिवे.
पुष्कळ, विश्वास , पुस्तक , शिल्प ,किल्ला
मुक्काम, जिल्हा , निष्ठा, तुझ्या , पुन्हा.
● तत्सम शब्द मुळ शब्दाप्रमाणे र्हस्व किंवा
दीर्घ लिहावेत. (संस्कृत शब्द )
उदा. शून्य , पूज्य , पूर्व , सूर्य ,धूर्त.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक )
पिंपळनेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६८७५
No comments:
Post a Comment