🔹संख्या ओळखण्याची अनोखी किमया🔹
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
मित्रांनो,
आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयातील
गमती -जमती पाहिल्या परंतु यावेळी मात्र
एक वेगळीच आयडिया आपण शिकणार
आहोत. एखाद्या व्यक्तीच्या मनातील संख्या
कशी ओळखावी, ते आपण शिकणार आहोत.
त्यासाठी गणितातील विविध क्रियांचा भडिमार
करावा लागतो इतकेच!फक्त या आयडियासाठी
समोरच्याला विचाराव्या लागणार्या प्रश्नांचा क्रम
कधीही बदलू नये, हे लक्षात ठेवा.
उदा. एका व्यक्तीच्या मनातील संख्या घेऊ.
(१) मनात कोणतीही एक संख्या धरा.
३
(२) या संख्येत २ मिळवा.
३ + २ = ५
(३) येणाऱ्या संख्येस ३ ने गुणा.
५ × ३ = १५
(४) या संख्येतून ५ वजा करा.
१५ - ५ = १०
(५) या संख्येतून मूळ (पहिली) मनात
धरलेली संख्या वजा करा.
१० - ३ = ७
(६) या संख्येला २ ने गुणा.
७ × २ = १४
(७) आलेल्या संख्येतून १ वजा करा.
१४ - १ = १३
व आलेली संख्या मला सांगा.
= १३
मित्रांने, समोरच्याने सांगितलेल्या संख्येतून
मनातल्या मनात १ वजा करून आलेल्या
उत्तराला ४ ने भागावे. मिळणारे उत्तर
म्हणजेच समोरच्याने मनात धरलेली संख्या !
१३ - १ = १२
१२ ÷ ४ = ३
म्हणजे समोरच्या व्यक्तीने मनात धरलेली
संख्या = ३
संकलक :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment