माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2017

पाण्याशी मैत्री

          🔹पाण्याशी मैत्री🔹

✍संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

  विज्ञानाच्या सरांनी आम्हांला पाण्याविषयी
उद्बोधक माहिती सांगितली.

(१) पाण्याची वैशिष्ट्ये :-
  ●पृथ्वीचा ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने
    व्यापला आहे.

  ●पृथ्वीवर केवळ ३ टक्के पाणी गोडे/
    पिण्यायोग्य आहे.

  ●आपल्या शरीरात सुमारे ७० टक्के
    पाणी असते.

  ●पाणी ही सर्व सजीवांची अत्यंत
    महत्त्वाची गरज आहे.

  ●पाणी हवेतही असते.त्याला बाष्प म्हणतात.

  ●पाणी जमिनीवर असते, तसेच ते
    जमिनीखालीही असते.
----------------------------------------------------

(२) विशेष माहिती :-
  ●जमिनीवरील पाणी झरे,नाले,नदी,तळी,
    सरोवरे या ठिकाणी असते.तसेच पाणी
   गोठून त्यापासून हिमनद्या व हिमनग
   तयार होतात.

  ●जमिनीखालील पाणी आपण विहिरी
    व कूपनलिकांमधून घेतो.

  ●पिण्यासाठी,स्वयंपाकासाठी,स्वच्छतेसाठी,
    शेतीसाठी, उद्योगांसाठी पाणी लागते.

  ●सांडपाणी एकाच जागी तुंबले, तर डास
    वाढतात आणि रोगराई पसरते.

  ●विषमज्वर, हगवण, नारू, अतिसार,
    कावीळ असे आजार दूषित पाण्यामुळे
    होतात.
--------------------------------------------------

(३) लक्षात घ्या.
  ●पाणी नेहमी उकळून व गाळून घ्यावे.

  ●पाणी काटकसरीने वापरावे.
-------------------------------------------------     संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि. धुळे
                 📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment