✨एका शब्दाचे अनेक अर्थ✨
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
📱 ९४२२७३६७७५
☆अंतर - (१)मन
(२)लांबी
☆अंक -(१)मांडी
(२)आकडा (संख्या )
☆अंग -(१) शरीर
(२) बाजू
☆कर -(१)हात
(२)सरकारी सारा
☆ दंड -(१)शिक्षा
(२)बाहू
☆नाद -(१)छंद
(२)आवाज
☆नाव -(१)होडी
(२)कशाचेही नाव
☆ गार - (१)थंड
(२) बर्फाची गोटी
☆ चूक - (१)दोष
(२)लहान खिळा
☆ जात - (१)प्रकार
(२)समाज
☆जोडा - (१)जोडपे
(२)बूट
☆धडा - (१)पाठ
(२)रिवाज
☆ धनी - (१)मालक
(२)श्रीमंत मनुष्य
☆पत्र -(१) पान
(२) चिठ्ठी
☆पास -(१)उत्तीर्ण
(२)परवाना
☆ बाल -(१)बालक
(२)केस
☆फळ - (१)यश
(२)झाडाचे फळ
☆रस -(१)द्रवपदार्थ
(२)गोडी
☆रक्षा -(१)राख
(२)रक्षण
☆ वचन -(१)भाषण
(२)प्रतिज्ञा
☆वजन -(१)भार
(२)मान
☆वळण - (१)वाकडा रस्ता
(२)प्रवृत्ती
☆वार -(१)घाव
(२)दिवस
☆सुमन - (१)फूल
(२)चांगले मन
☆हवा -(१)वायू
(२)पाहिजे असा
☆कलम -(१)लेखणी
(२)रोपांचे कलम
☆घट -(१)मडके
(२)झीज
☆चक्र - (१)चाक
(२)एक शस्त्र
☆चिमणी -(१)एक पक्षी
(२)गिरणीचे धुराडे
☆ तट -(१)किनारा
(२) किल्ल्याची भिंत
☆ताव -(१)तापविणे
(२)कागद
☆नग -(१)पर्वत
(२)वस्तू
☆वात -(१)वारा
(२)दिव्याची वात
☆हार -(१)पराभव
(२)फुलांचा हार
✍ संकलक:- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता. साक्री (धुळे)
📞 ९४२२७३६७७५
हात या शब्दाचे दोन अर्थ
ReplyDeleteAnd
Deleteपतिज्ञा या शब्दाचे दोन अर्थ
ReplyDeleteवात
ReplyDeleteवात
ReplyDelete