🔼 बहुरूपी ओळखा 🔼
🔹 खेळ -- पाणी 🔹
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे.
उद्देश :- एकच बाब, पण आकार बदलला,
उपयोग बदलला, संदर्भ बदलला की तिचे
स्वरूप बदलते याची विद्यार्थ्यांना ओळख
करून देणे.
सूचना :- वाचा , पहा आणि बहुरूप्याची किती
रूपे तुम्हाला ओळखता येतात ? वेळ
एका रूपाला अर्धा मिनिट.
प्रश्न वाक्य उत्तर
(१) वाहते पाणी -- नदी .
(२) साठलेले पाणी -- तळे .
(३) भरती-ओहटी येणारा
पाण्याचा प्रचंड साठा -- समुद्र.
(४)कड्यावरून कोसळणारे पाणी - धबधबा.
(५) गोठलेले पाणी -- बर्फ.
(६) आकाशातून पडणारे पाणी -- पाऊस.
(७) आकाशातून पडणारे घन पाणी - गारा.
(८) डोळ्यांतले पाणी -- अश्रू.
(९) तोंडातले गळणारे पाणी -- लाळ.
(१०)हिवाळ्यात पहाटे दिसणारे
पानावरचे पाण्याचे थेंब -- दवबिंदू.
संकलक : शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment