🔹वनांचे प्रकार 🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
वनस्पतींमध्ये झाडेझुडपे, वेली, गवत
इत्यादींचा समावेश होतो. विविध वनस्पती
प्रामुख्याने वनांत आढळतात. वनांचे पुढील
प्रकार पडतात.
(१) सदाहरित वने
(२) पानझडी वने
(३) काटेरी झुडपांची वने
● सदाहरित वने :-- सदाहरित वनांतील झाडे
नेहमी हिरवीगार असतात. म्हणून या वनांना
सदाहरित वने म्हणतात. या वनांत आंबा,
शिसव, फणस, जांभूळ, हिरडा, वेळू इत्यादी
झाडे आढळतात. या वनांत वृक्षांची व
वेलींची फार दाटी असते.
● पानझडी वने :- पानझडी वनांतील झाडांची
पाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला गळतात.म्हणून
या वनांना पानझडी वने म्हणतात.पावसाळ्या-
पूर्वी येथील झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात
झाडे पानाफुलांनी बहरतात. या वनांत साग,
खैर, वड, पिंपळ, कडुलिंब, ऐन, पळस, चिंच,
आवळा इत्यादी वृक्ष आढळतात.
● काटेरी झुडपांची वने :- काटेरी झुडपांच्या
वनांत कमी उंचीची झाडेझुडपे आढळतात.
नापीक जमीन व कमी पाऊस असलेल्या
प्रदेशात काटेरी झुडपे वाढतात. या वनांत
कोरफड, घायपात, बोर, बाभूळ व खुरटे गवत
इत्यादी वनस्पती या वनांत आढळतात.
संकलक :- शंकर चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment