🔸प्रश्नपेढी :- प्रथम सत्र 🔸
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर )धुळे
□ ९४२२७३६७७५□
विषय :- गणित तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक
● इयत्ता -पहिली ●
🔹पुढील प्रश्नांची तोंड उत्तरे सांगा.
(१)एका हाताला बोटे किती असतात ?
(२)तुमच्या मागे बसलेल्या मुलाचे/मुलीचे
नाव सांगा.
(३) १ ते ५ संख्या उलट क्रमाने बोला.
(४) एक गोळी अधिक तीन गोळ्या, एकूण
किती गोळ्या ?
(५) २ पेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही दोन
संख्या सांगा.
(६)तुमच्या वर्गखोलीला किती खिडक्या आहेत?
(७)फळयाला किती बाजू आहेत ? मोजा आणि
सांगा.
(८)तुमच्या दप्तरात एकूण किती पुस्तके आहेत ?
(९)५ रूपयांची दोन नाणी म्हणजे किती रुपये
ते सांगा.
(१०) ७ आणि ९ च्या मधली संख्या सांगा.
(११) १ ते १० संख्या क्रमाने बोला.
(१२)पक्ष्यांना किती पंख असतात ?
(१३)३ नंतर क्रमाने येणाऱ्या दोन संख्या सांगा.
(१४)सायकलीला किती चाके असतात ?
(१५) १० च्या मागच्या तीन संख्या क्रमाने सांगा.
(१६) ७ अधिक २ बरोबर किती ?
🔹 प्रात्यक्षिक --
(१) काड्यांच्या मदतीने ६ आणि २ ची बेरीज
दाखवा. वस्तू १० काड्या.
(२) मणीमाळेवर १० मणी मोजून दाखवा.
(१ ते १० मधील सांगितलेली संख्या मोजून
दाखवा. ) -- वस्तू १०-१०मण्यांच्या माळा)
(३) दाखवलेल्या चित्रकार्डावरील चित्रे मोजा व
ती किती आहेत ते सांगा.
-- वस्तू - १ते १० चित्रे असणारी चित्रकार्डे .
-------------------- s.s.chaure -----------------
* इयत्ता -दुसरी *
(१) बांगडीचा आकार कोणता आहे ?
(२)तुमच्या डाव्या बाजूला कोण बसले आहे.
(३)गणिताच्या पाठ्यपुस्तकाला किती कडा
आहेत.
(४)४६ ते ५३ पर्यत या संख्या क्रमाने म्हणा.
(५)३५ या संख्येत किती दशक आणि किती
एकक आहेत.
(६)बेरीज ११ येईल,अशी संख्यांची एक जोडी
सांगा.
(७)एका वर्षात किती महिने असतात ?
(८) २५ मधून शून्य गेले, किती राहिले ?
(९) ६ आणि ९ ची बेरीज किती येईल ?
(१०)एका आयताकार वस्तूचे नाव सांगा ?
🔹प्रात्यक्षिक --
(१)तुमच्या कंपासपेटीतील त्रिकोणी आकाराची
वस्तू दाखवा.
(२)मणीमाळेवर १५ मणी मोजून दाखव.
(३)हाताच्या वितीने बाकाची लांबी मोजा व
किती विती ते सांगा.
(४)लाकडाच्या पट्टीच्या साहाय्याने टेबलाची
उंची मोजा.
--------------------- s. s. chaure ------------
●इयत्ता -तिसरी ●
(१)चौकोनाला किती कडा व किती कोपरे
असतात ?
(२) एक शतक म्हणजे किती एकक ?
(३)सर्वांत लहान तीन अंकी संख्या सांगा.
(४)६० दशक म्हणजे किती शतक ?
(५)८ शतक म्हणजे किती दशक ?
(६) पुढील संख्यांचे वाचन करा. ७७७ , ४५६.
(७) ९९९ + १ = किती ?
(८) १०८ + ४ = किती ?
(९) ६० + ४० = किती ?
(१०) ७८५ मधून ८५ वजा केले, तर किती
उरतील ?
(११) आठचा पाढा म्हणा.
(१२) एका पिशवीत ६ गोळ्या, याप्रमाणे ६
पिशव्यांमध्ये किती गोळ्या ?
(१३) १५ × ० बरोबर किती ?
(१४) ६ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
(१५) धारकता मोजण्यासाठी कोणते एकक
वापराल ?
🔹प्रात्यक्षिक --
(१) दो-याच्या साहाय्याने वर्तुळ तयार करून
दाखवा. वस्तू -- दोरा
(२) शतकाचे बटवे,दशकमाळा व सुटे मणी
वापरून पुढील संख्या तयार करा.
५४० १२५ २१५ ६०३
वस्तू - शतकाचे बटवे, दशकमाळा व
सुटे मणी.
------------------s. s. chaure -----------------
■इयत्ता- चौथी ■
(१) लघुकोन म्हणजे काय ?
(२)आयताला किती बाजू असतात ?
(३) पुढील संख्या वाचा. २३४१ , ९८५०.
(४) ५००० + ३००० बरोबर किती ?
(५)विशालकोन म्हणजे काय ?
(६) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
(७) ९९९९ + १ बरोबर किती ?
(८)सम संख्या म्हणजे काय ?
(९) विषम संख्या म्हणजे काय ?
(१०) ६६६६ - ११११ बरोबर किती ?
(११)५०० रुपयांचे सुटे म्हणजे १०० रुपयांच्या
किती नोटा ?
(१२) २ तास म्हणजे किती मिनिटे ?
(१३)आॅगस्ट महिन्यात किती दिवस असतात ?
🔹प्रात्यक्षिक --
(१) कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढा व
त्यात त्याचा व्यास दाखवा.
(२) दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्यांची
स्थिती कशी असेल, ते दाखवा.
१२ वाजून १५ मिनिटे / ९ वाजून ४५ मिनिटे
संकलक :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता. साक्री जि.धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment